विवाहबाह्य संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकलं, मुंबईतील मालवणी येथील घटना

0

मुंबईतील मालवणी परिसरात विवाहबाह्य संबंधाला विरोध केला म्हणून एका व्यक्तीने पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला केला. या घटनेत पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहे. महिलेच्या फिर्यादीवरून च्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने २०१९ मध्ये आरोपीशी प्रेम विवाह केला होता. लग्नानंतर आपला पती बेरोजगार असून त्याला अमली पदार्थांचे व्यसन असल्याचे महिलेला समजले. महिलेने पतीच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध केला आणि घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, पत्नीच्या निर्णयामुळे संतापलेल्या पतीने तिच्यासोबत भांडणे सुरू केली. रोजच्या भांडणांना वैतागून महिला तिच्या माहेरी निघून गेली. दरम्यान, बुधवारी पीडिता आपल्या आई वडिलांच्या घरी असताना आरोपीने तिथे जाऊन तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले.

या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी जखमी झाली. पीडिताला ताबडतोब कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडिताने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या पतीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १२४ (२), ३११, ३३३ आणि ३५२ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)