राज्यात मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रोज अनेक घटना उघडकीस येत असतांना मुंबईच्या भांडुपमध्ये मात्र, एक वेगळीच घटना उघकडीस आली आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलीने आपल्याच अपहरणाचा आणि लैंगिक अत्याचार झाल्याचा बनाव रचला. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, हा बनाव रचण्याचे कारण देखील धक्कादायक आहे.
काय आहे घटना ?
मुंबईत शनिवारी भांडुप येथे ही घटना घडली. एक दहावीत शिकणारी मुलगी ही संध्याकाळी शाळेतून घरी येण्यासाठी निघाली. मात्र, रात्री १ वाजले तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे घरच्यांना चिंता लागली. घरच्यांनी तिच्या मित्रांकडे चौकशी केली. मात्र, तिची माहिती मिळाली नाही. तिच्या शोध घेण्यासाठी घरचे रेल्वे स्थानकाकडे गेले. यावेळी ती एकटीच स्थानकाजवळ बसलेली दिसली. घरच्यांनी टीची हाऊकशी केली असता तिने तिचे अपहरण झाल्याचे सांगितले. तिघांनी तिला रिक्षात बसवून स्थानकाजवळ नेत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिची मासिक पाळी आल्याने तिला त्यांनी सोडल्याचे तिने सांगितले. यानंतर पालकांनी मुलीला घेऊन पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी पोलिसांनी अपहरण व पॉक्सोअंतर्गंत गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा शोध घेतला.
असा झाला बनाव उघड ?
पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. पोलिसांनी रेल्वे स्थानकाशेजारचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, त्यांना कुठेही काही आढळले नाही. तसेच मुलीने दिलेला जबाब देखील भिन्न आढळला. त्यांनी पुन्हा मुलीची चौकशी केली. यानंतर तिने खरं सांगितलं. तिने तिच्या सोबत असे काही ही झाले नसल्याचं कबूल केलं.
आईचा ओरडा खाऊ नये म्हणून रचला बनाव
मुलीने यंदाचे दहवीचे वर्ष होते. ती अभ्यास करत नसल्याने तिची आई तिला ओरडायची. तिला ती सारखी अभ्यास कर म्हणून सांगायची. मात्र, तिने अभ्यासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे भीती पोटी तिने हा बनाव रचला. जेव्हा मुलगी स्थानकावर पालकांना मिळाली तेव्हा ती खूप घाबरली. यामुळे तिने लगेचच अपहरणाचा व अत्याचाराचा बनाव रचला.