"माझा खिसा कधी कापला गेला, मलाही कळलं नाही", शरद पवारांनी सांगितला ‘तो’ भन्नाट किस्सा!
जुलै २९, २०२४
0
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आज (रविवार) छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक मोतीराम राठोड यांच्या जीवनावर आधारीत पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी खिसा कापल्याचा एक भन्नाट किस्सा सांगितला. शरद पवार आपल्या भाषणात राजकीय जीवनातील अनेक किस्से आणि प्रसंग सांगत असतात. असाच एक किस्सा त्यांनी रविवारी एका जाहीर सभेत सांगितला. शरद पवार म्हणाले की, माझा खिसा कधी कापला गेला तर मला समजलंच नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. यानंतर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.
शरद पवार यांनी सांगितले, काही वर्षांपूर्वी मी एका अधिवेशनासाठी चाळीसगावमध्ये गेलो होतो. त्यावेळी आयोजकांनी मला सांगितले की यावेळीच्या अधिवेशनाचं वैशिष्ट म्हणजे, यंदा या भागातील सर्व गुन्हेगार याठिकाणी एकत्र जमले आहेत. मी गंमतीने त्यांना म्हटलं कोण लोक आहेत. या गुन्हेगारांचं असं काय वैशिष्ट आहे?त्यावर त्यांनी मला एका एकाची ओळख करून दिली. हे खिसा कापतात, हे अमुक गुन्हा करतात, ते तमुक गुन्हा करतात. ही त्यांची वैशिष्ट्य आहेत.ते म्हणाले, तुम्हाला हे वैशिष्ट बघायचं असेल तर ते या अधिवेशनाच्या ठिकाणीच बघायला मिळेल.
मी त्यांना विचारलं की हे खिसा कापतात का?ते म्हणाले हो,मग ज्याचा खिसा कापला जातो,त्यांना कळत नाही का? तेव्हा ते मला म्हणाले की तुमच्या खिशात हात घाला, मी खिशात हात घातला तेव्हा हात सरळ खाली गेला. माझा खिसा कधी कापला मला कळलंच नाही. मुळात हे स्किल समाजातील काही घटकांमध्ये परिस्थितीमुळे आलं, असेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बाबाजानी दुराणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शरद पवार आणि राजू टोपे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटात सामील झाल्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांनी म्हटले की,शरद पवारांची साथ सोडण्यांची स्थिती काय झाली?बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच म्हटले की, ‘कुछ तो मजबूरी रही होगी,वरना यूं कोई बेवफा नहीं होता’ असे म्हणत त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचे कारण सांगितले. मात्रयाआधी त्यांनी आपली अशी कोणतीच मजबुरी नसल्याचे म्हटले होते.
Tags