वादग्रस्त 'कन्हेय्या वडापाव' प्रकरणाचे गांभीर्य प्रशासन घेणार का? करवाई नक्की काय केली?
जुलै २९, २०२४
0
दत्तनगर चौकातील कन्हेय्या वडापाव दुकानातील वडापाव मध्ये अळी दिसून आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर २६ जुलै रोजी दुकानमालक रविकुमार गुप्ता यावर पोलिसांनी कारवाई केली. करवाई नक्की काय केली? की यातून दुकानमालकाचा बचाव केला? निकृष्ट दर्जाच्या वडापाव खाल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामांचे गांभीर्य घेतले गेले नाही का? यावर सविस्तर माहिती घेऊ.
संपूर्ण घटना
तेथील परिसरातील सागर भिसे नामक तरुण ज्याने व्हिडिओ व्हायरल केला त्याच्या म्हणण्यानुसार वडापाव घेऊन खाण्यास सुरुवात केल्या नंतर सुरुवातीलाच तो बेचव लागला. तीन ते चार घासानंतर त्यात अळी दिसून आली. त्यावर सर्वांच्या समक्ष हा प्रकार दिसून आल्यानंतर एकच खळबळ होऊन बाकी ग्राहकांचा दबाव निर्माण झाला. सागर याने या बाबतीत चा व्हिडिओ तिथे बनवल्याचे व्हिडिओत दिसून येते. प्रकरण स्थानिक रामनगर पोलीस स्टेशन मध्ये गेले. यापुढे दुसऱ्या दिवशी आणखी एक व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला त्यात परिसरातील काही तरुण संतापाने दुकान बंद पाडत होते. यावरून पोलिसात तक्रार केल्यानंतर ही दुसऱ्या दिवशी दुकान चालू होते. त्यानंतर प्रकरण स्थानिक माजी नगरसेवकाच्या माध्यमातून पुन्हा पोलीस स्थानकात गेले. एवढे वादाचे प्रकरणात आता कारवाई होईल असे समजून प्रकरणावर पडदा पडला.
खरच कारवाई झाली का?
याचे उत्तर शोधण्यास सुरुवात केली असता दिसून आले की एवढे गंभीर प्रकरण असताना दुकान मालक रविकुमार गुप्ता यावर फक्त भारतीय न्याय संहिता 285 चे कलम लावून कारवाई केली आहे. दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. यामध्ये सुरुवातीलाच अन्नाचा नमुना घेऊन त्यावर अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 नुसार गुन्हा नोंद करणे गरजेचे होते. सामान्य माणसास परवडणारे वडपाव या पदर्थातील निकृष्ट दर्जामुळे अनेकांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार असतात. अशी प्रकरणे गांभीर्याने न घेणे हेच याचे मूळ आहे. दुकान मालकाने तक्रारदार तरुण हे नशेबाज असून उधार न दिल्यामुळे बाहेरून अळी टाकून आणून व्हिडिओ बनवल्याचा दावा करत आहे. यात तथ्य नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. सगळी घटना उपस्थित जागीच घडली असल्याचे प्रत्यक्षदर्शिंचे म्हणणे आहे.
कठोर कारवाईची मागणी
आरोपीवर कठोर कारवाई करून त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी होत आहे. तसेच रविकुमार गुप्ता हा उग्र स्वभावाचा असून या आधी काही वर्षे अगोदर अशाच निकृष्ट दर्जा प्रकरणात कारवाई झाल्याचे स्थानिक सांगतात. दत्तनगर मधील दत्तमंदिर मागील त्यावेळच्या वादग्रस्त इमारतीत आरोपी गुप्ता चा एक गाळा असून इमारतीवर तोडक कारवाई होऊन देखील गाळ्यात व्यवसाय चालू ठेवला असून कधीही कोसळणाऱ्या इमारतीत उद्योग चालवून जीवित हानीला आमंत्रण देत आहे. अशा व्यक्तीवर कठोर कारवाई होणे गरजेचे असून खाद्य क्षेत्रात अन्न सुरक्षा विभागाने नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे झाले आहे.