महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनानेमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी ४६ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना सरकार दरमहा १ हजार ५०० रुपये देणार आहे.या योजनेचा लाभ विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिक्तत्या, निराधार सर्व स्तरातील महिलांना मिळणार आहे. १ जुलैपासून या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत. दरम्यान, मात्र, अनेकांना फॉर्म कुठे भरायचा? या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ही योजना राज्यातील महिला आणि मुलींसाठी राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले जातील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी विधानसभेत दिली.
माझी लाडकी बहिण योजनेसाठी कोणत्या महिला पात्र?
- २१ ते ६० वयोगटातील महिला.
- वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असलेल्या महिला.
- या योजनेचा लाभ घेण्याकरता कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावी.
- इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेस पात्र नसेल.
- सरकारी योजनेतून मानधन घेणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू नाही.
- सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
आवश्यक कागदपत्रे
१) आधार कार्ड
२) जात प्रमाणपत्र
३) मूळ निवासी प्रमाणपत्र
४) रेशन कार्ड
५) उत्पन्नाचा दाखला
६) बँकेचे पासबूक
८) मोबाईल क्रमांक
९) पासपोर्ट साईज फोटो
१०) माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म
फॉर्म कुठे भरायचा?
ग्रामीण भागातील महिलांना ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी लागेल.
शहरी भागतील महिलांना वॉर्ड ऑफिसरकडे नोंदणी करावी लागेल.