पुण्यातील कल्याणीनगर भागात एका बिल्डरपुत्रानं दोघांचा नाहक जीव घेतल्याचं प्रकरण भलतंच चिघळलं आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांवर अनेक आरोप झाल्यानंतर राज्याचं गृहखातं खडबडून जागं झालं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात जाऊन पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर चक्रे फिरली असून या प्रकरणात दोषी आढळलेल्या दोन पबवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. पुणे उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे. तसंच नियम उल्लंघन करणाऱ्या इतर आस्थापनांवर देखील कारवाई करण्याचे आदेस राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी दिले आहेत.
अपघातात गुंतलेल्या कथित अल्पवयीन मुलांना दारू पुरवल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागानं हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही पबवर नियमाच्या उल्लंघनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यावर कारवाई करण्यात आली आहे. या हॉटेल वा पबचे व्यवहार तात्काळ प्रभावानं बंद करण्यात आले आहेत.
पुण्यातील पब आणि बारची विशेष तपासणी
अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं पुणे शहरातील सर्व पब्ससह इतर परमिट रूमची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत उत्पादन शुल्क विभागानं घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहिलं जात आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील कल्याणीनगर भागात मध्यरात्रीच्या सुमारास अगरवाल नामक बिल्डरच्या अल्पवयीन मुलानं एका बाईकला धडक दिली होती. त्यात एका तरुणाचा व तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. बाईकला उडवणाऱ्या कारला नंबर प्लेटही नव्हती. तसंच, कार चालवणारा मुलगा मद्यधुंद अवस्थेत होता. हे सगळं झाल्यानंतरही त्याला तात्काळ जामीन मिळाला होता. हे प्रकरण भलतेच गाजले. पोलिसांवर देवाणघेवाणीचे आरोपही झाले होते. ओरड झाल्यानंतर आता कुठे कारवाईला सुरुवात झाली आहे.