This photo is taken from Vikas Ingle's Facebook handle. |
सुसंस्कृत डोंबिवली शहरात एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्रकार असल्याचे भासवून दबाव, धमकी, राजकीय ओळख असल्याचे भासवून पैसे उकळण्याचा गोरख धंदा करणाऱ्या अभिजित पवार या डोंबिवली एमआयडीसी विभागातील जिमखाना रोड वरील मातृप्रभा सोसायटीतील रहिवाशी असलेल्या भामट्यावर टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार ही महिला असून तिच्या तक्रारी नंतर अभिजित पवार याचे अनेक गैर व्यवहार समोर आलेले आहे. तक्रारदार महिलेचे शेलारनाका भागात एक चायनीज कॉर्नर असून तिथे पवार रात्री टाईमपास साठी जात होता. तिथे काही मुलांसोबत याचे खटके उडाल्यानंतर त्याचा राग म्हणून सदर महिलेला शिवीगाळ करण्याचा प्रताप या महाशयांनी केला आहे. तक्रारीनंतर अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत.
सुशिक्षित विभागात राहत असलेला अभिजित पवार पदवीधर असून वडील हे एमआयडीसी विभागातील निवृत्त कर्मचारी आहेत. घरची सधन परिस्थिती असताना कामाचा आळस आल्यामुळे चैनीच्या हव्यास असल्याच्या स्वभावामुळे २०१७ नंतर एनेक शक्कल लढवून पैसे उकळण्याचे प्रकार चालू केले. डोंबिवलीतील आगरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रगती महाविद्यालयात परीक्षेच्या वेळी पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या पवार ने सुरुवातील आपण प्रगती कॉलेज मध्ये इतिहास विषयाचा प्राध्यापक म्हणून असल्याचे भासावू लागला. त्यातून खजगी कोचिंग मध्ये काम व अनुभव न बघता नोकरी मिळण्यास सुलभ झाले. तसेच दरम्यान शिकविण्याची कला व व्यासंग नसल्याचे कोचिंग क्लास मालकांच्या लक्षात येताच त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. तिथल्या मिळणाऱ्या पैशांवर भागत नसल्याने नवीन शक्कल लढविण्यास सुरूवात केली. त्यानंतर या महाशयांनी बामसेफ संघटनेतील स्थानिक पातळीवर काम करण्यास सुरुवात केली व संघटनेसाठी निधी उभारण्याची जबाबदारी घेतली. होतकरू व प्राध्यापक मुलगा असल्यामुळे कार्यकर्त्यांनी चटकन विश्वास ठेवला. परंतु बामसेफ कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने हे पैसे स्वतःच अपहार करून लंपास केले. तसेच खोटे तक्रार अर्ज करणे व त्यातून ब्लॅकमेल करुन पैसे उकळणे, कॉल रेकॉर्डिंग हा गुन्हा असून असे कॉल रेकॉर्डिंग करून सोशल मिडियात पसरवून बदनाम करणे असे अजूनही चालू असल्याचे माहिती मिळत आहे.
कोविड काळापासून वेगवेगळे आजार असल्याचे सांगून सहानुभूती मिळविण्यास सुरूवात केली. आजारी असल्याचे भासवून पैसे लवकर मिळतात याचे गणित त्यास कोरोना काळामुळे समजले होते. सहानुभूतीेतून त्याने पत्रकार क्षेत्रात प्रवेश मिळवला. त्यात त्याचे कोणतेही कौशल्य नसल्याचे जाणकारांकडून सागितले असता त्याचा रागीट स्वभावाचे दर्शन देऊ लागला. पत्रकारिता क्षेत्रामुळे पोलीस अधिकाऱ्यांसोबत ओळख करून पुढे घरातील आजारपण, ऑपरेशन असे वरचेवर सांगून भावनिक करून पैसे उकळण्याचे प्रकार चालू केले. खूप उशिराने ही गोष्ट लक्षात आली असता अनेक जणांना भावनिक करून पैसे उकळल्याचे समजले. त्यात काही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा देखील समावेश आहे. काही साप्ताहिक पेपर टाकण्याचे काम करणाऱ्या भामट्याने आपण स्वतः या पेपर चे कार्यकारी संपादक असल्याचे भासवून रक्कमा गोळा केल्याची माहिती मिळते.
महिलांना टार्गेट
पवार याने आता पर्यंत फक्त महिलांना सॉफ्ट टार्गेट केल्याचे निष्पन्न झाले असून काही दिवसांपूर्वी कॉलेज मधील एका विद्यार्थिनीला मुलगी मानून तिचे जमलेले लग्न मोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. यासाठी चक्क त्याने अध्यात्म क्षेत्रातील उच्च विभूती अमृते यांचे नाव वापरून ज्योतिष भाकीत केल्याचे सांगून भाकड कथा सांगितल्या गेल्या. या विरोधात सदर मुलीने रामनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असता तिथेही आपले आयपीएस अधिकारी मित्र असल्याचे भासवत असताना पोलीस खाक्या दाखवताच छातीत दुखण्याचे नाटक हा नाटकी माणूस करू लागला. एका व्यक्तीला देखील महिलेच्या विषयावरून मारहाण केल्याचे राहत्या इमारतीमधील रहिवासी सांगतात. नुकतेच नवीन तक्रार केलेल्या विवाहित महिलेच्या बाबतीत देखील अशीच तक्रार आहे तसेच डोंबिवलीतील एका महिला सशक्तीकरण मंडळाच्या प्रतिष्ठित समाजसेविकेला बदनाम केल्याची माहिती क्षत्रिय मराठा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर दिली.
भोंदूगिरीत सहज पैसा मिळतो हे बघून पवार याने आपल्याकडे अतींद्रिय शक्ती असून आपल्याला सर्व काही समजते असा आव आणला. त्यासाठी डोंबिवली पूर्वेतील फडके रोड छेद रस्त्यावरील गडकरी वाडा येथील एका दत्त मंदिरात आपली गादी असून तिथे पौर्णिमा, अमावस्येला सर्वांना बोलवून दक्षिणा गोळा करण्यास सुरुवात केली. याच मार्गाने अनेकांना त्याने आपल्या जाळ्यात ओढून पैसे उकळल्याची शक्यता परिचितांकडून व्यक्त होत आहे.
राजकीय दबाव
पोलीस स्थानकात तक्रार गेल्यानंतर तिथे आपण डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत कार्यरत असून मुख्यमंत्री शिंदे पर्यंत आपली ओळख असल्याचे दाखले पवार कडून दिले जातात. स्टेशन परिसरातील एका कपडे व्यावसायकाला माराहन, घरडा सर्कल वरील खाद्यविक्रेत्याला मारहाण, एका चहा विक्रेत्याला मारहाण करून गुन्हा नोंद होऊ नये म्हणून पैसे देऊन प्रकरण मिटवण्यात आले. अशा प्रकरणांमध्ये त्याने चक्क डोंबिवली शहर पदाधिकाऱ्यांचे नाव वापरून बचाव केला आहे.
ब्राह्मण असल्याचे नवे अस्त्र
भोंदूगिरीतून पैसे मिळतो हे माहितीनंतर ब्राह्मण असल्याचा अडवान्स फायदा आपल्याला मिळणार हे हेरून पवार याने चक्क आपले आईवडील हे खरेखुरे आई वडील नसून आपल्याला दत्तक घेतल्याचे सांगू लागला. आपण मूळचे ब्राह्मन असून आपल्याला लहानपणी दत्तक घेतले असल्याचा यशस्वी बनाव रचला व त्याला अनेकजण बळी देखील ठरले. अशा प्रकारे सर्व गैर प्रकार या तक्रारीनंतर समोर आल्यामुळे तक्रारदार महिलेच्या पतीने परिचित मधील सर्वांना माहिती देण्यासाठी सोशल मीडियात एक पोस्ट बनवून टाकल्यामुळे अनेक प्रकार आता समोर येत आहे. अशा समाज विघातक व्यक्तीवर तातडीची कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत डोंबिवलीकर नोंदवत आहे.