सोमवारचा दिवस मुंबईकरांसाठी खूपच धक्कादायक होता. दुपारच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आल्याने भरदुपारी अंधार पडला. त्याचबरोबर वडाळ्यात पार्किंग लिफ्ट कोसळून ८ ते १० वाहने त्याखाली अडकली. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते मुलूंड दरम्यान ओव्हरहेट वायरचा खांब कोसळल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्यावर कडी म्हणजे घाटकोपरच्या छेडानगर भागात एका पेट्रोल पंपावर १२० फुटी महाकाय होर्डिंग कोसळून त्याखाली १०० हून अधिक लोक अडकले. त्यातील १४ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही ५० हून अधिक जणांवर उपचार सुरू आहे. दरम्यान कोसळलेल्या होर्डिंगबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. १४ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या होर्डिंगची नोंद थेट ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाल्याची शॉकिंग माहिती समोर आली आहे.
मुंबईत ४० फुटी होर्डिंग लावण्यास महापालिकेची परवानगी असताना हे १२० फुटी होर्डिग कसे लावले, असा सवाल केला जात असताना तसेच हे अनधिकृत पद्धतीने लावल्याचा आरोप होत असतानाच आता या होर्डिगच्या नावावर मोठी विक्रम असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील सर्वात मोठं होर्डिंग असल्याची नोंद लिम्का बुक रेकॉर्डमध्ये झाली आहे. पालिका जास्तीत जास्त ४० बाय ४० फुटी होर्डिंग उभारणीस परवानगी देते. मात्र अपघातग्रस्त होर्डिंग १२० बाय १२० फूट होते.
अनधिकृत असल्याचा आरोप मात्र‘लिम्का बुक’मध्ये नोंद
अपघातग्रस्त होर्डिंग इगो मीडिया कंपनीचे होते. तसेच ते रेल्वेच्या जागेवर उभारण्यात आले होते. मुंबई रेल्वेच्या पोलीस आयुक्तांकडून एसीपीद्वारे ४ होर्डिंगसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र होर्डिंग बनवण्याआधी संबंधित कंपनीने रेल्वे विभागाकडून अधिकृतपणे कोणतीही परवानगी किंवा एनओसी घेतली नसल्याचे समोर आले आहे.