डोंबिवली पूर्वेतील "ग" प्रभागात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत. मात्र, त्यातील अनेक बांधकामे ही विनापरवानगी आणि अनधिकृत असून त्याकडे संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. संगीतवाडी, रघुवीर नगर येथील इमारतीवर यापूर्वी तोडकामाची जुजुबी कारवाई करूनही विकासक राजू तिवारी, निलेश पाटील यांनी पुन्हा बेकायदा इमारतीचे काम सुरू केले आहे. ज्या बांधकामावर महानगरपालिका हातोडा मारते हीच बांधकाम काही महिन्यातच पूर्ण होऊन त्यांचा वापर सुरू होतो, हीच परंपरा मागील अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पाहायला मिळते आणि हेच एक धोकादायक चित्र आहे जे अशा बांधकाम करणाऱ्या लोकांवर नियंत्रण मिळू देत नाही महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांचं विकासकाशी असलेलं संगणमत हे या अभद्रव्यवतीस कारणीभूत आहे अनधिकृत बांधकाम करणारे आणि त्यांना संरक्षण देणारे अधिकारी मोकाट असल्यामुळेच शहरात कारवाई होऊन देखील बांधकामा तशीच आहेत. त्यामुळे ह्या बांधकामांवर कधी कारवाई केली जाते याकडे स्थानिक नागरिक, तक्रारदारांचे लक्ष लागले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची हमी राज्य सरकार आणि महापालिकेने मंगळवारी दिली. मुंबई हायकोर्टाने कठोर भूमिका घेतल्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाईल, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यात आले. मागील सुनावणीवेळी खंडपीठाने कठोर भूमिका घेत पालिका आणि राज्य सरकारला धारेवर धरत या बेकायदा बांधकामांविरोधात आतापर्यंत काय कारवाई केली, असा प्रश्न उपस्थित करत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले होते. त्यानुसार राज्य सरकार आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे प्रतिज्ञापत्र सादर करून याचिकाकर्त्यांच्या आरोपांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला. त्यावर याचिकाकर्त्यांना महिनाभरात उत्तर सादर करण्याची मुभा खंडपीठाने दिली.
मढवी बंगल्याजवळील सात माजली बेकायदा इमारतीवर कारवाई
म्हात्रेनगर मधील राजाजी रस्ता भागातील मढवी बंगल्याजवळ प्रवीण म्हात्रे, शिवा यादव या भूमाफियांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभी केली आहे. या इमारतीत व्यापारी आणि निवासी असे दोन भाग आहेत. या बेकायदा इमारतीवर यापूर्वी दोन वेळा तोडण्याची कारवाई पालिकेकडून करण्यात आली होती. पालिका अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा घेत भूमाफिया शिवा यादव, म्हात्रे यांंनी तोडलेल्या इमारतीचे बांंधकाम पुन्हा सुरू केले होते. या इमारतीच्या चारही बाजला वाहन जाण्याची सुविधा नसल्याने कामगारांच्या साहाय्याने या इमारतीचे तोडकाम बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. सहायक आयुक्त संजय कुमावत यांंनी पोलीस बंदोस्तात ही बेकायदा इमारत तोडण्याचे काम सुरू केले आहे.
कुंभारखाणपाडा येथील हरितपट्ट्यात उभारलेली बेकायदा इमारत भुईसपाट
महारेरा गन्ह्यात कुंभारखाणपाडा येथील अजिंक्य नारकर आणि सुनील नारकर या बंधूंंनी वास्तुरचना वास्तुविशारद फर्मचे पांडुरंग म्हात्रे यांच्या साहाय्याने उभारलेल्या सात माळ्याच्या बेकायदा इमारतीचा समावेश होता. यापूर्वी या इमारतीवर दोन ते तीन वेळा जुजुबी कारवाई यापूर्वीच्या साहाय्यक आयुक्तांकडून करण्यात आली होती. हरितपट्ट्यातील अडगळीच्या जागेत असलेल्या या इमारतीचे पाडकाम साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांंच्या मार्गदर्शनाखाली तोडकाम पथकाने मागील पधरा दिवसांंपासून पोकलेन यंंत्राच्या साहाय्याने सुरू केले होते. ही बेकायदा इमारत बुधवारी भुईसाट केली.