मुंबईत चोरी करून विमानानं गाव गाठायचा, आसाम येथील फ्लाईंग चोर 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात

0

चोरी करण्यापूर्वी बनावट केसांचा विग घालून वेश बदलणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चोरी केल्यानंतर हा चोर विमानाने आपल्या गावी जात असे. ठाणे क्राईम ब्रँचने कसून चौकशी करून आसाममधील या आरोपीला अटक केली आहे. मोईनुल अब्दुल मलिक इस्लाम असे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील अनेक भागात निर्जन आणि बंद घरांमध्ये चोरी करणाऱ्या या चोरट्याचे नाव आहे. तो मूळचा आसामचा आहे. त्यांनी ६२ लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, आरोपीने आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात १९, नवी मुंबईत २ आणि मुंबईत १ अशा एकूण २२ ठिकाणी चोरी केली आहे. या आरोपीच्या डोक्यावर केस नाहीत, त्याला टक्कल आहे. चोरी करताना तो नकली केस घालायचा, जेणेकरून त्याला कोणी ओळखू नये.

मुंबई ठाणे गुन्हे शाखेचे डीसीपी शिवराज पाटील यांनी सांगितले की, बनावट विगच्या नावाखाली ओळख लपवण्याचा प्रयत्न करणारा हा आरोपी आसामच्या होजई जिल्ह्यातून विमानाने ठाणे गाठत असे. इथे भाड्याने घर घ्यायचे. ज्या घरांमध्ये चोरी होणार होती, त्या घरांची तो तपशीलवार माहिती घेत असे. मुंबई ठाणे गुन्हे शाखेचे डीसीपी शिवराज पाटील यांनी सांगितले की, बनावट विगच्या नावाखाली ओळख लपवण्याचा प्रयत्न करणारा हा आरोपी आसामच्या होजई जिल्ह्यातून विमानाने ठाणे गाठत असे. जिथे त्याला चोरी करायची आहे, अशा ठिकाणी तो भाड्याने घर घेऊन तेथील माहिती मिळवायचा आणि त्यानंतर विमानाने आपलया गावी जायचा.यावेळी तो आपला फोनही बंद ठेवायचा.

माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेने या चोरट्याला त्याच्या मूळ गावी आसाममधून अटक केली आहे. त्याच्याजवळ सुमारे ६२ लाख रुपयांचे मौल्यवान सोन्याचे दागिने सापडले. गुन्हे शाखेने चोरीच्या घटनांच्या सीसीटीव्ही व्हिडीओचे तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण केले असता त्याने डोक्यावर बनावट केस घातल्याचे आढळून आले.तसेच आरोपीने आतापर्यंत किती सोने विकले आणि कुठे विकले याचा पोलीस तपास पोलीस करत आहेत. या चोरट्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)