करी रोड ते चर्नी रोड… मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची नावं बदलणार!

0

मुंबई रेल्वे स्थानकांना ब्रिटिशांनी दिलेली नावे आता इतिहासजमा होणार आहेत. मुंबईतील ८ ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासंदर्भात शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्यासोबत बैठक झाली. ब्रिटिश कालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा अधिकार राज्याला आहे, असेही शेवाळे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या सोबत बैठक घेणार आहेत.

राहुल शेवाळे आणि एकनाथ शिंदे यांच्यात मंगळवारी (१२ मार्च २०२४) सह्याद्री अतिथिगृहात बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शेवाळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीत मुंबईतील ८ ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी स्थानकांच्या नामांतराला मंजुरी दिली, अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली.

केंद्र सरकार ब्रिटिशांची ओळख पुसण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याची जनतेची मागणी आहे. या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी मिळाली. यावर मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब करून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहे', असे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोणकोणत्या रेल्वे स्थानकांची नावे बदलणार?

करीरोड, सॅण्डहर्स्ट रोड, मरीनलाईन्स, डॉकयार्ड, चर्नीरोड, कॉटन ग्रीन, मुंबई सेंट्रल आणि किंग्ज सर्कल मुंबईतील या ८ ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नाव बदलण्यात येणार आहेत.

ब्रिटिशकालीन ८ रेल्वे स्थानकांना 'या' नावाने ओळखले जाणार

१) करीरोड - लालबाग


२) सॅण्डहर्स्ट रोड - डोंगरी


३) मरीनलाईन्स - मुंबादेवी


४) डॉकयार्ड - माझगाव स्टेशन


५) चर्नीरोड - गिरगाव


६) कॉटन ग्रीन - काळाचौकी


७) मुंबई सेट्रलचे - नाना जगन्नाथ शंकर शेठ


८) किंग्ज सर्कल - तिर्थकर पार्श्वनाथ

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)