डोंबिवलीतील पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील शंखेश्वर गृहसंकुलाच्या एका सदनिकेत मसाज पार्लरच्या नावानं वेश्या व्यवसाय चालवला जात होता. अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांनी या अवैध्य धंद्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात नवी मुंबईतील उलवे येथील मसाज पार्लर चालवणाऱ्या महिलेविरुध्द टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जयश्री प्रमोद मुंढे असं मसाज पार्लरच्या नावानं सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आरोपी महिला दलालाचं नाव आहे.
आरोपी महिला दलाल ही हायप्रोफाईल सोसायटी असलेल्या शंखेश्वर गृह संकुलात "संस्कृती ब्युटी" आणि "मेडी स्पा" नावानं मसाज पार्लर चालवत होती. या पार्लरमधून दोन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली. या महिलांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं शरीरविक्रय व्यवसायात उतरल्या होत्या, असं पोलीस तपासात उघडकीला आलं. कारवाईच्या ठिकाणी सात हजार, इतर साधने आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली. मसाज पार्लर चालकानं अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्यानं पोलिसांनी मसाज पार्लर चालक जयश्री मुंढे हिच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वालगुडे आणि त्यांचं पथक डोंबिवलीत संस्कृती मसाज पार्लरवर छापा टाकण्यासाठी दाखल झालं. त्यांना टिळकनगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक ममता मुंजाळ यांनी संबंधित स्पा वर कारवाई केली.
अशी टाकली धाड....
या अनैतिक व्यवसायाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वालगुडे आणि त्यांचे पथक डोंबिवलीत संस्कृती मसाज केंद्रावर छापा टाकण्यासाठी दाखल झाले. त्यांना टिळकनगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक ममता मुंजाळ यांचे सहकार्य मिळाले. मसाज केंद्रात अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक पाठवून तेथे खरच अनैतिक व्यवसाय चालतो का याची खात्री केली. बनावट ग्राहक पोलिसांनी खुणा करून दिलेले पैसे घेऊन केंद्रात गेला. केंद्रात जाताच त्याच्याकडून दोन हजार ५०० रुपये घेण्यात आले. त्याच्या मागणीप्रमाणे शरीरसुखासाठी एक महिला त्याला उपलब्ध करून देण्यात आली. पोलिसांनी केलेल्या सूचनेप्रमाणे बनावट ग्राहकाने खोलीतून पोलिसांना मोबाईलवर संपर्क करून इशारा करताच वरिष्ठ अधिकारी चेतना चौधरी, ममता मुंजाळ आणि कारवाई पथक संस्कृती मसाज केंद्रात दाखल झाले. त्यावेळी तेथे दोन पीडित महिला आढळून आल्या. एक डोंबिवलीतील आयरेगाव, एक मुंबईतील ॲन्टॉप हिल भागातील होती. या महिला ३५ ते ३८ वयोगाटीतल आहेत. कारवाईच्या ठिकाणी सात हजार, इतर साधने आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली.
- यांच्यावर कारवाई कधी?