डोंबिवली भाजप मध्ये 'इनकमिंग' सुरू; राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का

0

 


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीला उधाण येतानाच आज डोंबिवलीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षातील ॲक्टीव पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश केला. शरद पवार गट युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण ग्रामीण सरचिटणीस योगेश डांगे व उपाध्यक्ष प्रवीण महाजन यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह डोंबिवली भाजप पूर्व मंडल कार्यालयात भाजपचे वरिष्ठ नेते शशिकांत कांबळे, नंदू परब, मुकुंद पेडणेकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यामुळे डोंबिवली भाजप मध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर इनकमिंग ची सुरूवात झाली अशी चर्चा चालू झाली असून आगामी काळात होणाऱ्या इनकमिंग वर लक्ष लागले आहे. 

             पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेला व राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विकासकामांनी प्रभावित होऊन त्यांच्या नेतृत्वात प्रवेश केला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रवेशासाठी डोंबिवली पूर्व मंडल सरचिटणीस मितेश पेणकर यांनी मेहनत घेतल्याची माहिती मिळत असून या प्रवेशात त्यांनी मार्गदर्शन केले असल्याचे समजते. भाजप ज्या प्रकारे युवकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास करत आहे हे मुख्य कारण नवीन युवक भाजप मध्ये येण्यास कारणीभूत असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या पक्षप्रवेश वेळी प्रकाश (बाळा) पवार, संजीव बिडवाडकर, सचिन म्हात्रे, रविसिंग ठाकूर, धनाजी पाटील, रामचंद्रजी माने, पूनमताई पाटील, अथर्व कांबळे, अंकित रयानी, रुपेश पवार, दीपक त्रिपाठी, शरद जैन व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

             आधीच ताकद कमी असलेल्या विधासभा क्षेत्रात तरुण फळीतील कार्यकर्त्यांनी पक्षांतर केल्यामुळे एन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला हा मोठा धक्का असल्याचे समजते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)