डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चोरी, साेन साखळी चाेरी व घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. घरफोडी, चैन स्नॅचिंग, रिक्षा चोरीच्या गुन्हयातील अट्टल चोरटयांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षा चोरी आणि घरफोडीचे प्रत्येकी पाच, तर चैन स्नॅचिंगचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. रिक्षा चोरीच्या गुन्हयात सात रिक्षांसह, घरफोडीच्या गुन्हयात चोरीला गेलेला १ लाख १९ हजार तर चैन स्नॅचिंगच्या गुन्हयातील १ लाख २० हजाराचा माल जप्त केला आहे. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम चोपडे ,प्रशांत आंधळे ,संपत फडोळ, पोलीस कर्मचारी राजेंद्र खिलारे ,सोमनाथ टिकेकर ,संजू मिसाळ ,दीपक गडगे यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला.
२० जानेवारीच्या सागांव येथील चैन स्नॅचिंगच्या गुन्हयाचा तपास करताना पोलिसांनी चार चैन स्नॅचरना गजाआड केेले आहे. स्वप्नील माधवानी उर्फ करकटया बाबु, कलीम शेख, जावेद शेख आणि इरफान शेख सर्व रा. मुंब्रा, कळवा अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींविरोधात टिळकनगर, रामनगर, कळवा, चितळसर पोलिस ठाण्यात याआधी आठ गुन्हे दाखल आहेत.
घरफोडी गुन्हयातील अफताब ईर्शाद मोमीन या सराईत चोरटयाला अटक केली आहे. साथीदार तौसिफ अन्सारी याच्यासह मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार गुन्हे केल्याची त्याने कबुली दिली आहे. त्याच्याकडून सोने, चांदिचे कॉईन, आठ हजार रूपयांची रोकड,एक मोबाईलचा इअरफोन असा ५९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दावडी येथील घरफोडी प्रकरणात राहुल घाडगे या भंगार व्यावसायिकाला अटक केली आहे. त्याच्याकडून ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरोधातही यापुर्वी ९ गुन्हे दाखल आहेत अशी माहिती वरीष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांनी दिली.
कल्याण डोंबिवली उल्हासनगर परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा चोरणाऱ्या दोन चोरट्यांना मानपाडा पोलीसानी मोठ्या शिताफीने अटक केली. नासिर हुसेन, शाहरुख शहा अशी या चोरट्याची नावे असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. त्यांच्या विरोधात मानपाडा,बाजारपेठ , हिललाईन ,महात्मा फुले ,टिटवाळा, टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. चोरी केलेल्या रिक्षा ते कागदपत्र गहाळ झाल्याचा बनाव रचत मिळेल त्या किमतीत विकत होते. त्यांच्याकडून सात रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांनी आणखी काही रिक्षा चोरी केल्याचा संशय असून मानपाडा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी तपास करत भिवंडी येथे सापळा रचत घरफोडी करणाऱ्या आफताब मोमीन या सराईत चोरट्याला बेड्या ठोकल्यात. आफताब विरोधात मानपाडा, नारपोली ,भोईवाडा ,निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याच्याकडून आतापर्यंत साठ हजार रुपये किमतीचे ,सोन्याचे दागिने, मोबाईल ,रोख रक्कम मानपाडा पोलिसांनी हस्तगत केले.
काही दिवसांपूर्वी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ६४ वर्ष महिलेचे साेन साखळीची चाेरी झाली होती. मानपाडा पोलिसांनी स्वप्नील माधवानी उर्फ करकट्या बाबू याच्यासह त्याचे साथीदार कलीम हरून शेख उर्फ बंगाली बाबू ,जावेद शेख, इरफान सिद्दीकी शेख या चार सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्यात. या चोरट्यांविरोधात टिळक नगर ,डोंबिवली, कळवा चितळसर पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत .यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात मानपाडा पोलिसांना यश आलंय.