बहिणीच्या मित्राने घरात घुसून तरुणीवर केला बलात्कार; पुण्यातील कात्रज भागातील धक्कादायक घटना

0

पुण्यात महिलांवरील अत्याचारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिला घरात सुद्धा सुरक्षित नसल्याच्या अनेक घटना रोज उघडकीस येत आहे. अशीच एक घटना कात्रज भगत उघडकीस आली आहे. बहिणीचा मित्र असलेल्या तरुणाने घरात शिरून झोपलेल्या तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना रविवारी घडली असून या प्रकरणी एका तरुणावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वास पारडे (२९, रा. गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फिर्यादीच्या घरी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते चारच्या सुमारास घडला. तरुणीने रविवारी या प्रकरणी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विश्वास पारडे हा फिर्यादीच्या बहिणीचा मित्र आहे. यामुळे त्याचे फिर्यादीच्या घरी येणे जाणे होते. गेल्या सोमवारी फिर्यादी तरुणी ही घरात झोपली होती. यावेळी आरोपीने फिर्यादीचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, हा प्रकार फिर्यादीने तिच्या मित्राला सांगितला. याचा राग धरून विश्वास पारडे याने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियंका निकम करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)