पंतप्रधान मोदींचे शरद पवारांवर शरसंधान! म्हणाले कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना..

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यवतमाळमधून अनेक विकासकामांचा शुभारंभ केला. यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी पुन्हा एकदा ४०० पारचा नारा देत काँग्रेस व शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला. मोदी म्हणाले की, देशाचा विकास करण्यासाठी आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा समर्पित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बुधवारी भारी (यवतमाळ) येथे महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात बोलताना मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
काँग्रेसवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, आमच्या आधीच्या सरकारमध्ये दिल्लीतून १ रुपया जरी निघाला तर लाभार्थ्यापर्यंत केवळ १५ पैसे पोहोचत होते. तेव्हा कृषीमंत्रीही महाराष्ट्रातले होते, मात्र शेतकऱ्यांना काही मिळाले नाही. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर तोफ डागली आहे. आज मी केवळ एक बटण दाबले आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात २१हजार कोटी इतकी मोठी रक्कम जमा झाली. हीच तर मोदींची गॅरंटी आहे. मात्र जर काँग्रेस सरकार असते तर या २१ हजार कोटींपैकी १८ हजार कोटी मधल्या मध्येच गडप झाले असते.
शरद पवारांवर टीका :

२०१४ आधी देशाचे कृषीमंत्री महाराष्ट्रातले होते,तेव्हा पॅकेज जाहीर व्हायचं पण शेतकऱ्यांना मिळायचं नाही. सरकारमध्ये दिल्लीतून १ रुपया जरी निघाला तर लाभार्थ्यापर्यंत केवळ १५ पैसे पोहोचत होते. मात्र आता चित्र बदलले आहे. आज मी एक बटण दाबले आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी एवढी मोठी रक्कम पोहोचलीय. हीच तर मोदींची गॅरंटी आहे.
मोदींच्या भाषणातील मुद्दे :
  • पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. जय सेवालाल,जय बिरसा नारा देत भाषणाला सुरुवात. बंजारा भाषेत महिलांना नमस्कार केला.
  • आज मी एक बटण दाबले आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी एवढी मोठी रक्कम पोहोचलीय. हीच तर मोदींची गॅरंटी आहे. काँग्रेस शासन असते, तर २१ हजार कोटींपैकी १८ हजार कोटी खाऊन टाकले असते.
  • १० वर्षांपूर्वी चाय पर चर्चा करायला विदर्भात आलो तेव्हा तुम्ही NDA ला ३०० पार केले. २०१९ मध्ये आलो तेव्हा ३५० पार पोहोचवले. आणि आता २०२४ मध्ये जेव्हा विकास पर्वाला आलो आहे. तेव्हा देशात एकच आवाज आहे, अब की बार ४०० पार.
  • यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर सहित पूर्ण विदर्भाचा आशीर्वाद मिळत आहे. विदर्भाने ठरविले आहे युती सरकार ४०० पार होणार आहे.
  • आम्ही शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत. आम्ही देखील देशवासियांचे जीवन घडविण्यासाठी एक मिशन घेऊन चाललो आहोत. देशातील कानाकोपऱ्याला विकसित करण्याचा संकल्प केला आहे.
  • घरोघरो पाण्याचे नळ पोहोचवण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करेल. ई-रिक्षासोबतच आता महिला ड्रोन उडवतील. ड्रोन पायलटचे प्रशिक्षण महिलांना देण्यात येईल. ड्रोनचा फायदा शेतीमध्ये होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)