ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. तशी मागणी देखील स्थानिक शिवसैनिकांकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी शिवसैनिकांनी केलेल्या मागणीचा मी मनापासून आदर करते, परंतु मला व्यक्तिगत विचाराल तर अजून माझ्यापर्यंत अधिकृत अशी माहिती पोहोचली नसल्याचं त्या म्हणाल्या.
कल्याण लोकसभेत पक्षप्रमुख जो उमेदवार देतील त्याच्या प्रचार मी करेन, मी या मतदारसंघात तळ ठोकून राहणार, याचा अर्थ असा नाही की मी लगेच निवडणूक लढणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुक्त संवादाच्या दौऱ्याअंतर्गतच कल्याण लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी घेतल्या, उमेदवार जाहीर करणे हे पक्षप्रमुखांच्या अधिकारात आहे. पुढील आठ दिवसात कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चितपणे जाहीर होईल. जो कोणी उमेदवार असेल तर उमेदवारासाठी सगळे शिवसैनिक ताकतीने लढतील असे सुषमा अंधारे यांनी सांगितले