डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर रोडवर चहा विक्रेत्याला मारहाण झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. मारहाण झालेला व्यक्ती अरुण (३४) याला जबर मारहाण झाली आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहिती नुसार मारहाण केलेल्या तरुणाचे वय अभिजित पवार (पत्रकार) असून चहा पिऊन निघताना क्षुल्लक कारणामुळे मारहाण झाली असल्याचे समजते आहे. या मध्ये अरुण याला काचेचा ग्लास, स्टील टोप डोक्यात घालून रक्तबंबाळ केले. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत अरूनला महापालिकेच्या शासकीय शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला जबर मारहाण झाल्यामुळे पुढील उपचार चालू आहेत.
या प्रकरणात अभिजित पवार याने राजकीय दबाव आणल्यामुळे फिर्यादी अरुण यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अभिजित पवार विरुद्ध या आधी अनेक तक्रारी डोंबिवली रामनगर तसेच अन्य पोलीस स्थानकामध्ये अर्ज स्वरूपात आल्याची माहिती आहे.
मी चहा पिऊन झालेला काचेचा ग्लास घेऊन पैसे दिले का असे विचारले असता मला शिव्या देऊन जोरात मारहाण केली. डोक्याला मारहाण झाल्यामुळे मी बेशुद्ध पडलो. जाग आल्यानंतर मी हॉस्पिटल मध्ये होतो. मी गरीब घरचा असून या अवस्थेत पण मला काम करणे मजबूरी आहे. मी इथे एकटा असून मोठ्या लोकांसोबत लढायची माझी आर्थिक ताकद नाही.
--- अरुण ( मारहाण झालेला कामगार)