मंत्र्यांच्या बंगल्यांवर तब्बल ३० कोटींचा खर्च करण्यात आला. गेल्या पाच महिन्यात मंत्र्यांच्या बंगल्याचे नुतनीकरण करण्यात आले. मंत्री बंगल्यांच्या नावावर काढण्यात आलेली ६० टक्के रक्कम ही कागदोपत्री असून बोगस आहे. यापैकी ३० टक्के रक्कम खरी कामाची आहे, असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, मंत्र्यांच्या बंगल्यावरील खर्चावरुन विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी ट्विट करत जोरदार हल्लाबोल केला आहे. जनतेला मरू द्या, आपले मंत्री आमदार खुश राहले पाहिजे हीच आहे मोदींची खरी गॅरंटी! एकीकडे महायुतीतील मंत्र्यांना खुश ठेवण्यासाठी खैरात आणि उधळपट्टी सुरू आहे. दुसरीकडे आरोग्य सुविधांच्या अभावी महाराष्ट्रातील सामान्य माणूस रस्त्यावर दम तोडतोय. विषबाधा झालेल्या रुग्णांना उपचार देण्यासाठी डॉक्टर नाही, यंत्रणा नाही आणि महायुतीचे मंत्री आलिशान बंगल्यामध्ये झोपा काढताय. विकसित भारत संकल्प फक्त टीव्हीवर जाहिरातींमध्ये. प्रत्यक्षात संताप आणि चीड आणणारे वास्तव आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
कुठल्या बंगल्यावर किती खर्च झाला? संपूर्ण यादी- सुधीर मुनगंटीवार- पर्णकुटी (एक कोटी ५० लाख)
- गुलाबराव पाटील- जेतवन (एक कोटी १५ लाख)
- राधाकृष्ण विखे पाटील- रॉयल स्टोन (एक कोटी ५८ लाख)
- अतुल सावे- शिवगड (एक कोटी ४ लाख)
- अजित पवार- देवगिरी (१९ लाख ८९ हजार)
- दीपक केसरकर- रामटेक (७५ लाख ४२ हजार)
- तानाजी सावंत- लोहगड (८७ लाख ४६ हजार)
- बाळासाहेब भवन- ब्रह्मगिरी (एक कोटी ५७ लाख)
- चंद्रकांत पाटील- सिंहगड (५२ लाख ३७ हजार)
- राहुल नार्वेकर- शिवगिरी (४२ लाख)
- विजयकुमार गावित- चित्रकूट (एक कोटी ५४ लाख)
- उदय समंत- मुक्तागिरी (एक कोटी १६ लाख)
- संदिपान भुमरे- रत्नसिंधू (३७ लाख २६ हजार)
- दिलीप वळसे पाटील- सुवर्णगड (७३ लाख)
- अब्दुल सत्तार- पन्हाळगड (५० लाख)
- अदिती तटकरे- प्रतापगड (३५ लाख १९ हजार)