सीवूड्स परिसरात बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या
जानेवारी १४, २०२४
0
नवी मुंबईत गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. शनिवारी (दि १३) उलवे येथील सीवूड सेक्टर ४४ मधील एका बिल्डरच्या कार्यालयात घुसून काही हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. डोक्यात गोळी लागल्याने बिल्डरचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मनोज सिंह (वय ३९) असे हत्या करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. काही हल्लेखोर शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्या कारीलयात घुसले. आणि त्यांनी गोळीबार करत सिंह यांचा खून केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज सिंह हे या भागातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे नवी मुंबईच्या उलवे भागात सीवूड सेक्टर ४४ मध्ये त्यांचे कार्यालय आहे. शनिवारी ते सकाळी त्यांच्या कार्यालयात गेले होते. यावेळी काही हल्लेखोर त्यांच्या कार्यालयात घुसले. सिंह हे त्यांच्या चेंबरमध्ये असतांना आरोपींनी तयांच्यावर गोळ्या झाडल्या. यातील एक गोली ही सिंह यांच्या डोक्यात लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
यानंतर हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या दोन मुली या कार्यालयात आल्यावर सिंह हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी येत पंचनामा केला असून आरोपींना पडकण्यासाठी पथकांची स्थानपणा करण्यात अलायी आहे. दरम्यान, एखाद्या जवळच्याच व्यक्तीनं बांधकाम व्यावसायिक मनोज सिंह यांची हत्या केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.