डोंबिवली : रिपब्लिकन युवा सेना महाराष्ट्र अध्यक्ष किरण घोंगडे यांनी दि. ५ डिसेंबर रोजी डोंबिवली मधील भाजी विक्रेता फेरीवाला यांची भेट घेतली. गेली ४ ते ५ दिवसांपासून मार्केट बंद आहे. आम्ही फेरीवाल्यांनी जगावे कसे असे स्थानिक फेरीवाला शिव गर्जना भाजी व फळ विक्रेता संघचे अध्यक्ष नाना पाटील सचिव अशोक केदार, विजय दांडगे यांनी स्थानिक अध्यक्ष किरण घोंगडे यांना सांगितले. आमची क. डों. म. पा. चे प्रभाग ‘फ’ आणि प्रभाग ‘ग’ चे सहाय्यक आयुक्त तथा सहायक पोलिस आयुक्त डोंबिवली विभाग यांच्या सोबत बैठक झाली परंतु काहीही तोडगा निघाला नाही. रिपब्लिकन युवा सेना महाराष्ट्र अध्यक्ष किरण घोंगडे यांनी स्थानिक आमदार तथा सार्वजानिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना संबंधित समस्यांचे निवारण करण्यासाठी निवेदन दिले.
निवेदनात फेरीवाल्यांच्या बाजूने पथ विक्रेता कायदा २०१४ नुसार जे मार्केट ५० वर्षे जुने आहे त्या मार्केटला विरासत प्राकृत बाजार सर्वेक्षण करून घोषित करण्यात यावा, विरासत प्राकृत बाजर मध्ये ना फेरीवाला क्षेत्र घोषित करता येणार नाही तेथील फेरीवाल्यांना विस्थापित करता येणार नाही. कारण ते प्राकृत बाजर आहे असे फेरीवाला कायद्यात धारा २१ आणि ३८ मध्ये आहे. सोबत रेल्वे स्टेशन परिसरातील १५० मीटर फेरीवाला बद्दल १ नोव्हेंबर २०१७ च्या मा. उच्च न्यायालयाने २०१४ च्या फेरीवाला सर्वेक्षण मध्ये ओळखलेल्या फेरीवाल्यांचे स्वरक्षण दिले आहे. रेल्वे स्टेशन पासून १५० मीटर आतील फेरीवाल्यांना स्वरक्षण उच्च न्यायालयाने दिले आहेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कोर्टाचे आदेश एकतर्फी करू नये अशा आशयाचे निवेदन देखील संबंधित विभागांना देण्यात आले आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा आमदार, कल्याण पूर्व विधानसभा आमदार, कल्याण पश्चिम विधानसभा आमदार महापालिका क्षेत्रातील सर्व ४ पैकी ३ आमदार यांना सुद्धा निवेदन द्वारे माहिती देण्यात येणार आहे असे रिपब्लिकन युवा सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष किरण घोंगडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. ४ आमदारांनी विधानसभा मध्ये/हिवाळी अधिवेशनात डोंबिवली मधील गोर-गरीब फेरीवाल्यांची बाजू मांडावी म्हणून फेरीवाला पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेणार आहेत. रिपब्लिकन युवा सेना सोबत आहे अशी ग्वाही देत, रिपब्लिकन युवा सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष किरण घोंगडे यांनी फेरीवाल्यांच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. हिवाळी अधिवेशन नंतर फेरीवाल्यांच्या मुद्यावर लक्ष देतो. असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
फेरीवाल्यांना मानसन्मान आणि सुसज्ज व्यवस्था मिळेपर्यंत निरंतर संबंधित प्रशासनासोबत पत्रव्यवहार होईल पाठपुरावा होईल वेळ पडली तर न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी आणि रस्त्यावर संवैधानिक मार्गने भव्य आंदोलनाच्या दृष्टीने आमची चर्चा चालू आहे, या कार्यात मुख्य भूमिका शिव गर्जना भाजी व फळ विक्रेता संघाची आहे. अशी माहिती दिपक भालेराव यांनी दिली.
फेरीवाल्यांना मानसन्मान आणि सुसज्ज व्यवस्था मिळेपर्यंत निरंतर संबंधित प्रशासनासोबत पत्रव्यवहार होईल पाठपुरावा होईल वेळ पडली तर न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी आणि रस्त्यावर संवैधानिक मार्गने भव्य आंदोलनाच्या दृष्टीने आमची चर्चा चालू आहे, या कार्यात मुख्य भूमिका शिव गर्जना भाजी व फळ विक्रेता संघाची आहे. अशी माहिती दिपक भालेराव यांनी दिली.