कल्याण : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौध्द धम्माचा स्वीकार केला. याच वेळी त्यांनी संकल्प केला होता की, पुढील धम्म दिक्षेचा कार्यक्रम हा १६ डिसेंबर १९५६ ला मुंबईच्या रेसकोर्स मैदान करायचा. परंतु ६ डिसेंबर रोजी १९५६ रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले.
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आंतरराष्ट्रीय बौध्द धम्म परिषदेचे आयोजनकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले (राष्ट्रीय अध्यक्ष आर पी आय (आ) यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि.१६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता रेसकोर्स मैदान,महालक्ष्मी मुंबई येथे करण्यात आले आहे. सदर जागतिक धम्मपरिषदेचे उद्धघाटन दलाई लामा (जागतिक बौध्द धम्मगुरू) यांचे शुभ हस्ते करण्यात येणार आहे.
३५ देशांतील राष्ट्रप्रमुख, राजदुत व धम्मगुरू यावेळी उपस्थित राहणार आहेत यासाठी ठाणे जिल्हातून जास्तीत जास्त बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणारच व कल्याण डोंबिवली येथून जास्तीत जास्त बसेस मी स्वतः खर्चाने उपलब्ध करून देईन असा ठाम निर्धार मा. प्रल्हाद जाधव ( माजी नगरसेवक क. डों.म.पा/कल्याण जिल्हा अध्यक्ष आरपी आय (आ) यांनी व्यक्त केला आहे. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण अंतिम यात्रेचे साक्षीदार असलेले आरपीआय ज्येष्ठ नेते मा.अण्णासाहेब रोकडे (माजी नगरसेवक क.डों.म.पा) यांनी वेळी प्रेरणादायी आठवणी सांगितल्या. तसेच धम्म परिषदेत तरुणांची संख्या जास्त असेल व इथुन पुढे युवा नेतृत्व पुढे येऊन सामाजिक,राजकीय व धार्मिक क्रांती केल्या शिवाय आम्ही राहणार नाही अशी भीमप्रतिज्ञा मा. जय प्रल्हाद जाधव (कल्याण जिल्हा युवाअध्यक्ष आरपीआय (आ) यांनी केली. या जागतीक धम्म परिषदेच्या निमित्ताने आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्त्यांनी आपली ताकद दाखवून कोणताही विरोध न करता आपल्या विरोधकांना सोबत घेऊन डॉ.बाबासाहेबांचे विचार अमलात आणून प्रसार केला पाहिजेल असे किशोर मगरे (ठाणे जिल्हा उपाध्यक्ष) म्हणाले. जगात भारताला बुध्दाची भूमी म्हणुन ओळखली जाते. विविधतेतील एकता हीच भारताची एकात्मता आहे. मी सर्व आंबेडकरी चळवळीतील नेत्यांचा आदर करते.
बाबासाहेबांनी झोप कमी घेतली म्हणुन तमाम भारतीय जनता सुखाची झोप घेतेय. सदर धम्म परिषदेला कोणी राजकिय वळण न देता सर्व सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी एकत्र येऊन ही जागतीक पातळीवर धम्म परिषद यशस्वी करावी,असे प्रतिपादन ॲड. अपेक्षा दळवी (ठाणे प्रदेश महिला आघाडी) यांनी केले.
यावेळी बाळ भालेराव (ठाणे जिल्हा सरचिटणीस), अरुण गायकवाड (युवक अध्यक्ष ठाणे जिल्हा), किशोर मगरे (जिल्हा उपाध्यक्ष), सतीश जाधव (उद्योग आघाडी), समाधान तायडे,तुकाराम मुरलीधर पवार (कल्याण डोंबिवली शहर संपर्क प्रमुख) शशी पवार, यांच्या समवेत अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.