"मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्या सहकारी मंत्र्यांना दिलेल्या जाहीर सल्ल्याचा अर्थ तोच आहे राज्यात जेव्हा सध्याचे 'डबल इंजिन सरकार सतेत आले तेव्हाही अधिवेशनातील सत्ताधारी मंत्र्यांची अनुपस्थिती, अभ्यास कच्चा असल्याने विरोधकाच्या प्रऱ्यांची उत्तरे देताना त्यांची उडालेली भंबेरीत्यामुळे झालेली सरकारची नामुष्की चव्हाट्यावर आलीच होती. गेल्या अधिवेशनात दोन्ही सभागृहात मंत्रीच नसल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची आपात तीन-चार वेळा आली होती. हा सगळा 'अनुभव' असल्यानेच मंत्र्यांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न झाला असावा", असेही सामना अग्रलेखातून म्हटले आहे.
अग्रलेखात पुढे असे म्हटले आहे की,"सरकारला आणखी एक 'इंजिन' आणि काही डबेही जोडले गेले आहेत. तेव्हा अधिवेशनात विरोधकाच्या हल्ल्याने काही डबे रुळावरून घसरण्याची नामुष्की याही वेळेस ओढवली तर काय? त्यातूनही कदाचित मंत्र्यांना सावध केले गेले असावे. पुन्हा गोष्ट एवढद्यावरच थांबलेली नाही. “नीट तयारीत या,अशी तंबीही या मंत्र्याना देण्यात आली आहे. अधिकात्याकडून ब्रीफिंग नीट घ्या, अधिकारयांनी दिशाभूल करणारी माहिती देण्याचा प्रकार खपवून घेऊ नका, असे मंत्र्यांना बजावले गेले आहे”
"भाजपचे एक आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे खासदारपुत्र यांच्यातील 'तू तू-मैं मैं' सुरूच असते. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांकडे त्यांचेच आमदार त्याच्याच पक्षाच्या मंत्र्यांबाबत तक्रार करतात आणि मुख्यमंत्र्यांनाही त्यांच्या मंत्र्यांना तंबी देण्याची वेळ येते, हा कोणता समन्वय म्हणायचा? हे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात ना समन्वय राहिला आहे ना विश्वास, वारंवार ओढवते आहे ती फक्त नामुष्कीच सध्या असलेले सरकार आणि त्यांचा कारभार ही महाराष्ट्रासाठी नामुष्की नाही तर काय आहे?" असाही प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.