तीन लाखाच्या कर्जाची ऑफर देऊन मुंबईतील महिलेचे ५ लाख लुबाडले!
नोव्हेंबर २४, २०२३
0
मुंबई : कुरियर कंपनीतून बोलत असल्याचे सांगत एका २५ वर्षीय तरुणीला स्वत लोनची ऑफर देत तिची तब्बल ५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. या प्रकरणी पवई येथील रहिवाशी असलेल्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करणाऱ्याने तिच्या बचत खात्याच्या तपशीलांची ऑनलाइन पडताळणी करण्याच्या बहाण्याने मुलीला नेट बँकिंगमध्ये साइन इन करायला लावले. तसेच तसेच पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी तिला त्वरित कर्ज पर्यायावर क्लिक करण्यास सांगून तिच्या नावावर तीन लाखांचे कर्ज घेतले. यानंतर कर्ज दिलेल्या रकमेसह तिच्या खात्यातील मुळ रक्कम असे ५ लाख रुपये ऑनलाइन लंपास केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी १३ नोव्हेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या मुलीला ५ ऑक्टोबर रोजी एका कुरिअर कंपनीच्या पार्सल विभागातील अधिकारी म्हणून करत असणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला. या व्यक्तीने तिला कमी व्याज दारावर लोन देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला ही तरुणी बळी पडली.
फोन करणाऱ्याने तरुणीला व्हिडिओ कॉल करत तिच्या बँक खात्यात जात नेट बँकिंगचे तपशील घेतले. यानंतर तिला तिचा आधार कार्ड क्रमांकाची पडताळली करण्यासाठी आलेला पीन त्यात टाकण्यास सांगितले. यानंतर तिला पुन्हा तिच्या ऑनलाइन बँकिंग खात्यात लॉग इन करण्यास सांगितले. यानंतर त्यातील झटपट कर्ज पर्यायावर क्लिक करण्यास सांगण्यात आले. यावेळी तरुणीच्या नावावर कर्ज घेत तिच्या खात्यात ३ लाख रुपये जमा झाले. यानंतर त्याने तरुणीला लाभार्थी खाते तयार करण्यास सांगितले. यात त्याने तिच्या खात्यातील आधीच्या १.८३ आणि ३ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले.
यावेळी तिच्या दुसर्या बँक खात्याचे तपशील देखील बोलण्यात गुंतवून तिच्या कडून काढून घेतले. यावेळी काही तरी चुकीचे होत असल्याचा संशय तरुणीला आला. यावेळी तिने दुसर्या खात्यात लॉग इन का करावे असे विचारल्यावर फसवणूक करणाऱ्याने कॉल डिस्कनेक्ट केला. दरम्यान, तिने तीचे खाते तपासल्यावर त्यात कोणतीही रक्कम आढळली नाही. या प्रकारे तरुणीच्या नावावर कर्ज काढून तिच्या कर्जाच्या रकमेसह तिच्या खात्यातील १.८३ हजार अशी एकूण ४ लाख ८३ हजारांची रक्कम सायबर चोरट्याने लुटली. यानंतर या तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी तक्रार दिली.