हक्काच्या घराचं स्वप्न पाहताय..? म्हाडाच्या ११ हजार घरांच्या किमती होणार कमी

0

मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे निवारा. प्रत्येक जण आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न घेऊन कष्ट करत असतो. मात्र सध्याच्या काळात गगनाला भिडलेले जागेचे दर आणि महागलेल्या बांधकाम साहित्यामुळे स्वत:च्या मालकीचं घर घेणं आवाक्याच्या बाहेर गेले आहे. गरीब व मध्यम वर्गीयांना परवतील अशा घरे म्हाडा बांधत असते. मात्र म्हाडाच्या घरांच्या किंमतीही सर्वांना परवडतील अशा नसतात. मात्र आता म्हाडा घरांच्या किंमती कमी करणार असल्याने तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती कमी केल्या जाणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतूल सावे यांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून म्हाडा लॉटरीतील हजारो घरे विक्रीविना तशीच पडून आहेत. अशा विक्री अभावी पडून असलेल्या घरांच्या किमतींचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे.

अनेक वर्षापासून बांधून तयार असलेली व विक्रीविना पडून असलेली घरे स्वस्त होणार आहेत. म्हाडाच्या सरसकट घरांच्या नव्हे तर म्हाडा लॉटरीतील अनेक वर्षापासून पडून असलेल्या घरांच्याच किमती कमी होणार असल्याचं अतुल सावे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे. विक्री अभावी पडून असलेल्या घरांच्या किंमतीचा आढावा घेणार असून या घरांच्या किंमती कमी करून पुनर्विक्री करणार असल्याचंही यावेळी मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं.

म्हाडाच्या सुमारे ११ हजार घरांच्या किंमती कमी होणार आहेत. संबंधित घरांचं वीज बिल, पाणी पट्टी भरावी लागत असल्यानं म्हाडाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आल्याचंही यावेळी मंत्री सावे यांनी सांगितलं आहे. संबंधित घरांचं वीज बिल, पाणी पट्टी यामध्ये म्हाडाचा बराच पैसा खर्च होतो. अशा तब्बल ११ हजार घरांची कमी किमती करुन पुन्हा विक्री करून नुकसान टाळत महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)