भूतबाधेपासून पतीचे रक्षण करण्याच्या बहाण्याने मांत्रिकाचा महिलेवर बलात्कार; ब्लॅकमेल करून ७८ लाख लुटले

0

वसई : मुंबईत वसई येथे एका मांत्रिकाने गुप्त धन, आर्थिक प्रगती तसेच पतीला भूतबाधा आणि वाईट सवईपासून दूर करण्याचे आमिष दाखवत एका ५६ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना वसई येथे उघडकीस आली आहे. एवढेच नाही तर मांत्रिकाने या महिलेला ब्लॅकमेल करत तिच्या कडून ७८ लाख लुबाडले. दरम्यान मांत्रिक आणखी पैशांची मागणी करू लागल्याने पीडित महिलेला पक्षाघाताचा झटका आला. दरम्यान, महिलेच्या मुलीला आणि पतीला तिची डायरी सापडल्याने यातुन या प्रकरणाचा उलगडा झाला. या प्रकरणी वसई पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून मांत्रिक आणि त्याच्या सहा अनुयायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीलेश हातवाल असे आरोपी मांत्रिकाचे नाव असून या प्रकरणी महिलेच्या पतीने वसई पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडित महिलेचे पती हे सेवानिवृत्त सरकारी अधिकारी आहे. घरगुती कामानिमित्त ते रत्नागिरीला ये-जा करत होते. दरम्यान, २४ सप्टेंबरला त्यांच्या पत्नीला पक्षाघाताचा झटका आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान, याची माहिती मुलीने दिली. एवढेच नाही तर त्यांच्या मुंबईतील वाशी येथील सेक्टर १० मध्ये असणाऱ्या त्यांच्या गरी लिंबू मिरची तसेच जादू टोणा करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य सापडल्याचे देखील सांगितले. एवढेच नाही तर मुलीला तिच्या आईची डायरी देखील सापडली. ज्यामध्ये लाखोंचे व्यवहार, काही लोकांची नावे आणि त्यांच्या कुंडल्या सापडल्या. दरम्यान, या बाबत संशय आल्याने टीने सर्व प्रकार वडिलांना सांगितला. यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.

पीडित महिलेचे पती आणि तक्रारदार यांनी महिलेची ही डायरी तपासली असता तांना त्यात त्यांच्या पत्नीच्या हाताने लिहिण्यात आलेले अरधिक व्यवहार दिसले. फेब्रुवारी २०२३ पासून यात अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात पुढे आले. यात मांत्रिक नीलेश हातवालाने व आणखी सात जणांची नावे होती. मांत्रिकाने पीडित महिलेला अघोरी कृत्यासाठी गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी नेण्यात आल्याचेही त्यात लिहिले होते. महिलेचा नवरा याच्यावर वाईट हवा असून या पासून पतीचा बचाव करण्यासाठी धार्मिक विधी करत असल्याचे देखील पीडित महिलेने लिहिले होते.

मांत्रिक हातवाले त्याची पत्नी अर्चना हातवाले, सागर जेजुरकर, विजय बाबेल, नानाभाऊ, भक्ती आणि अनुसया कांबळे असे आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

पीडित माहीलेला विश्वासात घेऊन जादू टोणा विधी करत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याचे व्हिडिओ काढत धनादेश आणि सोन्याने दागिने देण्याची मागणी केली. मांत्रिकाणे महिलेला ब्लॅकमेल करत तिच्याकडून ७८.६४ हजार उकळले. यामुळे ही महिला आजारी पडली. दरम्यान, मांत्रिकाचा एक सहकारी हा महिलेच्या घरी २३ सप्टेंबर रोजी गेला. त्याने महिलेला पिण्यास काही तरी दिले. यामुळे तिची प्रकृती ही आणखी गंभीर झाली. यात तिला पक्षाघाताचा झटका आला. यानंतर महिलेने पनवेलमध्ये राहणाऱ्या तिच्या मुलीला बोलावून घेतले. तिच्या मुलीने पीडित महिलेला हॉस्पिटलमध्ये भरती केले. यानंतर सर्व प्रकार माहीलेने आपल्या मुलीला सांगितला.

मांत्रिक हातवालाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तिची फसवणूक केल्याचे देखील माहीलेने सांगितले. धार्मिक विधीच्या बहाण्याने त्याने बळजबरी करत बलात्कार केल्याचे देखील पीडित महिलेने सांगितले. यानंतर याचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते विवाहितेला ब्लॅकमेल करत होते. त्यांनी पीडित महिलेच्या बँक खात्यांची महनीती घेत त्यातून पैसे काढले. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली दिली. यानंतर महिलेच्या पतीने वाशी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)