हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री, गुजरातची साथ सोडली

0

हार्दिक पांड्या अखेर मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. एका रिपोर्टनुसार, मुंबईने ट्रेडच्या माध्यमातून हार्दिक पांड्याला आयपीएल २०२४ साठी आपल्या संघात समाविष्ट केले आहे. हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्समध्ये सामील होणे हा आयपीएल २०२४ पूर्वी मोठा फेरबदल आहे. आयपीएल ट्रेडमध्ये अनेकदा खेळाडूंची अदलाबदल होते. म्हणजेच आयपीएलचे संघ खेळाडूंची देवाणघेवाण करतात, पण हार्दिक पांड्याच्या बाबतीत असे घडले नाही.

'क्रिकबझ'च्या वृत्तानुसार, गुजरात टायटन्सने या डीलमध्ये मुंबई इंडियन्सकडून हार्दिकच्या बदल्यात एकही खेळाडू घेतलेला नाही. या डीलमध्ये मुंबई आणि गुजरात या दोन्ही संघांचा सहभाग होता. मुंबई इंडियन्स ही हार्दिक पांड्याची जुनी आयपीएल फ्रँचायझी आहे, ज्याद्वारे त्याने या स्पर्धेत पदार्पण केले होते. पण २०२२ मध्ये, नव्याने आलेल्या गुजरात टायटन्सने त्याला त्यांच्या संघाचा भाग बनवले. हार्दिकने गुजरातसाठी यशस्वी कर्णधार असल्याचे सिद्ध केले आहे.

आयपीएल २०२२ चे विजेतेपद पटकावले

गुजरात टायटन्सने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२२चे विजेतेपद पटकावले होते. यानंतर हा संघ आयपीएल २०२३ मध्ये उपविजेता राहिला.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा IPL २०२३ च्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने शेवटच्या चेंडूवर पराभव केला होता. अशाप्रकारे गुजरात टायटन्स सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावण्यापासून वंचित राहिले.


गुजरातने हार्दिकसह ९ खेळाडू रीलीज केले

गुजरातने हार्दिक पंड्यासह ९ खेळाडूंना सोडले आहे. यामध्ये यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ आणि दासुन शनाका यांच्या नावांचा समावेश आहे.

गुजरात टायटन्सचा सध्याचा संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, केन विल्यमसन, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, वृध्दिमान साहा, मॅथ्यू वेड, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, विजय शंकर, जयंत यादव, दर्शन नळकांडे, मोहम्मद ली शमी, शमी. , आर साई किशोर, मोहित शर्मा, नूर अहमद, राशिद खान.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)