तर ठाण्यातला 'तो' जेलमधून सुटला नसता!" ठाण्यातील "त्या" नेत्याबद्दल मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट!

0

मुंबई : चार्टर घेऊन आम्ही त्यावेळी मुंबईत गेलो नसतो तर ठाण्यातला तो व्यक्ती जेलमधून सुटला नसता, असे वक्तव्य कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून कर्जतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय वैचारिक मंथन शिबीरामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार गटाच्या ठाण्यातील नेत्याबाबत हा गौप्यस्फोट केला आहे.

धनंजय मुंडे म्हणाले की, "आज कुणी भुरट्यांनी बोलावं. एक प्रसंग असा आला होता की, जर चार्टर घेऊन मला तटकरे साहेबांसोबत मुंबईला पाठवलं नसतं तर कदाचित हा व्यक्ती आजही जेलच्या बाहेर निघु शकला नसता. ही गोष्ट तुम्ही विसरला असाल पण माझ्यासारखा कार्यकर्ता हे विसरु शकत नाही. हे लोकं तुम्हाला भेकड म्हणत आहेत. त्याप्रसंगी तो व्यक्ती एवढा घाबरला होता की, ऐनवेळी चार्टर घेऊन आम्हाला मुंबईत यावं लागलं होतं. अशा प्रसंगी या गोष्टी पुढे येणं गरजेचं आहे," असेही त्यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले की, "त्या पक्षात काहीजण एवढे उतावळे झालेत की, दादांची जागा मिळवल्याचा भास त्यांना व्हायला लागला आहे. पण २०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात जागा मिळाली नाही म्हणून राजीनामा देऊन पुन्हा कर्जत जामखेडमध्ये भाजपच्या तिकीटावर उभे राहणारे आज दादांवर आरोप करत असतील तर आम्ही सहन करणार नाही," असे ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)