भिवंडीत बॉयलर कारखान्यात भीषण स्फोट

0

भिवंडी :
भिवंडीत एका कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. एका बॉयलरमध्ये हा भीषण स्फोट झाला आहे. स्फोटानंतर बॉयलरमध्ये मोठी आग लागली. ही आग एवढी भीषण आहे की आगीचे लोट दूरवरुन दिसून येत होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, हा स्फोट कसा झाला याची माहिती अद्याप समजू शकली नाही. तसेच आगीत कुणी जखमी अथवा मृत्यूमुखी पडल्याची देखील माहिती मिळू शकली नाही.

भिवंडी येथे एक कारखाना असून या कारखान्यात अचानक बॉयलरचा स्फोट झाला. मधरात्रीच्या सुमारास झालेल्या या स्फोटामुळे नागरिक भयभीत झाले. या स्फोटानंतर बॉयलरने पेट घेतला. बॉयलर असलेल्या संपूर्ण इमारतीला मोठी आग लागली आहे. ही आग एवढी भीषण होती की आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत होते. स्फोट झाल्यानंतर स्थानिक नागरीक मोठ्या प्रमाणात घटनास्थळी जमा झाले. त्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. दरम्यान, ही घटना पोलिसांना कळल्यावर पोलिसांचे एक पथक आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले आहे. काही तासांच्या प्रयत्नांतर आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती आहे. दरम्यान ही आग कशी लागली हे समजू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळी येताच या ठिकाणी जमलेली गर्दी पांगवली. यानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)