मराठा आरक्षणासाठी आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद; जरांगेंना पाठिंबा

0

  


नवी मुंबई : सरकारला मराठा आरक्षणासाठी ४० दिवसांची मुदत देऊनसुद्धा सरकारने कोणतेच पावले उचलली नसल्याने आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा जालना येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने आम्हाला फसवले असल्याची टीका करत जो पर्यन्त आरक्षण मिळत नाही तो पर्यन्त उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला आहे. त्यांच्या या आंदोलनाला आता राज्यभरतून पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात आज आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर निदर्शने आणि आंदोलन केले जात आहे. काही ठिकाणी पुदहऱ्यांना गाव बंदी करण्यात आली आहे. दरम्यान, अरक्षणच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबई मार्केट कमिटीच्या सर्व माथाडी कामगारांनी एकत्रित येत आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सोबतच मार्केट बंद ठेवण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, आज मार्केट बंद राहणार असल्याने नवी मुंबईतील भाजीपाला पुरवठा बंद राहणार आहे. या सोबतच फळ मार्केट, फूल मार्केट, मसाला मार्केट देखील बंद राहणार आहे. नरेंद्र पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे हे देखील या बैठकीला उपस्थितीत होते. त्यांच्या उपस्थितीत माथाडी कामगारांनी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)