मुलाला मारल्याने संतापलेल्या बापाने बहिणीची केली हत्या; भाच्यालाही केले अर्धमेले

0

ठाणे : ठाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाला मारल्याने एका व्यक्तीने त्याच्या ४० वर्षांच्या बहिणीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत तिची हत्या केली. एवढेच नाही तर बहिणीच्या मुलालाही मारहाण करून गंभीर जखमी केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बहिणीने मुलाला शिवीगाळ केल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केले. ही घटना रविवारी कोंकणी पाडा चाळीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजू लोखंडे (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. तर दुर्गा अनिल कुंटे (वय ४०) असे खून झालेल्या बहिनीचे नाव आहे. तर तिचा १४ वर्षांच्या मुलगा यश हा मारहाणीत गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीच्या बहिणीने त्याच्या मुलाला कोणत्यातरी कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण केली होती. ही बाब मुलाने वडिलांना सांगितली. यामुळे संतप्त झालेलल्या संजू लोखंडे यांनी त्याच्या बहिणीच्या घरी जात याचा जाब विचारला. तसेच लोखंडी पाईपाने बहिणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या यानंतर तिचा मुलगा यश मध्ये पडल्याने त्याला देखील आरोपीने मारहाण केली. या मारहाणीत बहिणीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी रविवारी पहाटे लोखंडेला अटक केली असून त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०३ (खूनाची शिक्षा) आणि ३०७ (हत्येचा प्रयत्न) कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)