मराठा आरक्षणाविरोधात बोलणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड

0

मुंबई : मराठा आरक्षणाविरोधात बोलल्यानाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची मध्यरात्री तोडफोड करण्यात आली. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात सदावर्ते यांच्या गाडीची मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून यात बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील फुलंब्री गावचे सरपंच मंगेश साबळे यांच्यासह आणखी दोघांचा समावेश आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती.

सदावर्तेंच्या परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये असणाऱ्या घराबाहेर आज सकाळी त्यांची गाडी उभी होती. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन अज्ञात सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली. यानंतर तोडफोड करणारे फरार झाले. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी केली आहे. सदावर्ते म्हणाले, मला वारंवार धमक्या येत आहेत तसेच जीवे मारण्याची धकमी दिली जात आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. त्यामुळे मराठा आरक्षण रद्द करण्यात आले होते. यामुळे तेव्हापासूनच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत मराठा समाजामध्ये रोष आहे. याचेच पडसाद हे आज उमटले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)