Nagpur | १४० जणांची सुटका, ४० मूकबधीर मुलांनाही वाचवलं, बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण

0

नागपूर : नागपुरात मुसळधार पावसाने कहर केला आहे. ढगफूटी सदृश पावसाने नागपुरातील रस्ते जलमय झाले आहेत. तर रस्त्यांना नद्यांचं स्वरु आले आहे. पावसाच्या प्रवाहात अनेक वाहने वाहून केली आहेत. तर अनेक भागांत पावसाचं पाणी साचलं आहे. सीताबर्डी येथील बस डेपो संपूर्ण पाण्याखाली गेला आहे. अनेकांच्या घरातही पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. सकाळपासून एनदीआरएफच्या दोन तुकड्या आणि लष्कराच्या तुकडी मार्फत बचावकार्य सुरू करण्यात आले असून आतापर्यंत १४० नागरिकांशी सुटका करण्यात आली आहे. तर मुकबधिर मुलांना देखील वाचवण्यात आले आहे. या सर्व परिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत.

नागपुरात मध्यरात्री ४ तासांत तब्बल १०९ मिमि पावसाची नोंद झाली. या पावसामुळे नागपूर जवळपास बुडाले आहे. अनेक भागात पाणी साठले आहे. काही परिसरात तब्बल ६ फुटापर्यंत पाणी साठले होते. सीताबर्डी, मोरभवन परिसर पाण्याखाली गेला असून नाग नदीला पूर आल्याने काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. मदत व बचावकार्यासाठी लष्कराच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर एनदीआरएफच्या २ तुकड्या तर एसडीआरएफच्या देखील २ तुकड्या ७ गटात विविध भागात बचावकार्य राबवत आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमूंनी आतापर्यंत १४० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे.

येथील मुक-बधीर विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. नागपूर शहराच्या विविध भागात २ एनडीआरएफ चमू बचाव कार्य करत आहेत. अग्निशमन दल सुद्धा मदत कार्य करत आहेत. अंबाझरी परिसरात लष्कराच्या २ तुकड्या पोहोचल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)