माजी नगरसेवकांना, आमदारांना, पोलीस प्रोटेक्शन देण्यासाठी खर्च केला जातो; कल्याण डोंबिवलीतील स्थानिक लोकप्रतिधींनींना टोला
सप्टेंबर २४, २०२३
0
कल्याण : कल्याण डोंबिवली मधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत बोलताना रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिधींनींना टोला लगावला. या भागातील मुख्यमंत्री आहेत, या भागाला मोठे मोठे मंत्रिपद लाभले आहेत, मुख्यमंत्र्यांच्या जवळची मंडळी देखील याच भागातले आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, या भागातील परिस्थिती चांगली असेल असं मला वाटलं होतं मात्र प्रत्यक्षात असं काही दिसत नाही, या रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. माजी नगरसेवकांना, आमदारांना पोलीस प्रोटेक्शन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो पण सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठेही खर्च झालेला दिसत नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये वाद विकोपाला गेला आहेत. या मतदारसंघात भाजपच्या बैठका सुरू आहेत. याबाबत बोलताना आमदार रोहित पवार यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपच्या बैठका सुरू आहेत. यावरून समजून घ्या भाजपच्या मनात काय आहे, भाजप नेहमीच लोकनेते यांना संपवतो, भाजपमध्ये आयात केलेल्या नेत्यांना देखील भाजपने संपवलं. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा शिंदे साहेबांचा महत्त्व हळूहळू कमी केले जाईल अशी भीती आहे.
तसेच श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात जर तुमची युती असेल तर भाजप बैठका का घेतेय, सर्व चाचपणी का करतेय असा सवाल केला तसेच भाजपला फक्त त्यांचे चिन्ह आणि त्यांच्याच पक्ष समजतो अशी परिस्थिती नक्कीच करेल जेणेकरून भाजपसोबत जे नेते गेले ते भाजपच्या चिन्हावर लढतील अशा परिस्थितीमध्ये हे सर्व नेते पलीकडे गेलेले आहेत. ते काय भूमिका घेतात हे बघावे लागेल, अनुराग ठाकुर यांना या जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे. कारण तिथे मुख्यमंत्री साहेबांचा मुलगा खासदार आहे कुठेतरी दबक्या आवाजात कळतंय की आज जे पीडब्ल्यूडी मिनिस्टर आहेत रवींद्र चव्हाण यांना कदाचित भाजपकडून येथून उमेदवारी दिली जाऊ शकते असा गौप्यस्फोट केला
Tags