जगप्रसिद्ध सुला वाईन कंपनीला नोटीस; सरकारने ठोठावला ११६ कोटी रुपयांचा दंड

0

नाशिक : अन्य राज्यांतून मिश्रण आणत कंपनीत मद्य निर्मिती केल्याच्या आरोपाखाली राज्य सरकारकडून जगप्रसिद्ध सुला विनयार्डस कंपनीला कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी सुला विनयार्डसला कंपनीला नोटीस जारी करत तब्बल ११६ कोटी रुपये भरण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळं आता भारतासह जगभरातील मद्यप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. नाशिक जिल्हा हा द्राक्षांच्या उत्पादनासाठी प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यामुळं जिल्ह्यातील सुला वाईन कंपनी द्राक्षापासून वाईनची निर्मिती करते. त्यामुळं जगभरातून मद्यप्रेमी नाशिकमधील या कंपनीत येत असतात. परंतु आता राज्य सरकारकडून सुला वाईन कंपनीला ११६ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईच्या विरोधात सुला वाईन कंपनीने कोर्टात धाव घेतली आहे. महाराष्ट्राशिवाय अन्य राज्यांतून वाईनरीचे मिश्रण आणून त्याचं महाराष्ट्रात उत्पादन केल्यामुळं राज्य सरकारने व्याजासह कर लावून दंड वसूल करण्याचे निर्देश दिले आहे. यापूर्वी अनेकदा सुला वाईनरीला दंडाच्या नोटीसा जारी करण्यात आल्या होत्या. परंतु प्रकरणं कोर्टात गेल्याने सुला वाईन कंपनीला प्रत्येक वेळी दिलासा मिळाला होता. कस्टम सीमा ओलांडून तसेच इतर राज्यांमधून आणलेल्या वाइनच्या मिश्रणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात वाईनची निर्मिती केल्यास त्यावर अधिकचा कर तसेच दंड आकारण्याची तरतूद कायद्यात करण्यात आलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)