डोंबिवलीतील मानसी हाईट्स हाउसिंग सोसायटीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
ऑगस्ट १६, २०२३
0
डोंबिवली : दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस सर्व भारतीय खूप उत्साहात आणि आनंदात साजरा करतात. यावर्षी देशात ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्त देशभरातच तसेच शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी संपूर्ण देशवासीयांच्या मनात आनंदाची आणि देशाप्रती अभिमानाची भावना असते. देशाच्या अमृत महोत्सवाचा आनंद आणि उत्साह शासन दरबारीच नाही तर भारताच्या प्रत्येक घरात ओसंडून वाहतो. विविध स्तरांवर समाजातील प्रत्येक वर्गाकडून देशाच्या स्वातंत्र्याचा महोत्सव आनंदाने साजरा केला जातो. डोंबिवली शहरातील मानसी हाईट्स को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या वतीने ७६ व्या स्वातंत्र्य दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सोसायटीत विविध उपक्रम राबवण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ध्वजारोहण करून झाली. सदर वेळी ध्वजारोहण सोसायटीतील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी सैनिक श्री. मारुती सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सामूहिक गायन करण्यातआले. सर्वप्रथम संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन कु. श्रेया खिलारी व मनस्वी मोरे यांनी वाचन केले. तसेच देशभक्तीपर गीतगायन व विविध वेशभुषा कार्यक्रम पार पडला. नागरीकांनी स्पर्धकांना दाद दिल्यामुळे कार्यक्रमात उत्साह टिकून राहिला.
कार्यक्रमाची सांगता अक्षरा माने,सिद्धांत शेळके, सादिया खान, सुबोध भुवड, रावी मालकर, तेजस आंगणे, प्रणित देवाडिगा , जीविका पावडे, आराध्य बुरीवार, सिद्धी जगताप , तन्मय कुलकर्णी , यश वैद्य, अन्वी सकपाळ , दुर्वांश राजपूत, अचिंत्य पुजारी, साहीशा लिंब, अद्या पेडणेकर, प्रणित यांनी सामुदायिक वंदे मातरम गायन करून झाली.
१५ ऑगस्ट हाच दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून का निवडला?
१८ जुलै १९४७ रोजीच भारताला स्वातंत्र्य मिळाले असे म्हटले जाते. परंतु तरीही त्यासाठी स्वातंत्र्यदिन म्हणून १५ ऑगस्टला ओळख मिळाली. त्यामागील वास्तव असे आहे की, तत्कालीन आणि शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणागतीचा दुसरा वर्धापनदिन भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस म्हणून निवडला. कारण त्यांनी हा दिवस स्वतःसाठी शुभ मानला. म्हणून १५ ऑगस्ट हा दिवस भारतासाठी 'स्वातंत्र्यदिन' म्हणून निवडण्यात आला.