शरद पवार एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री झाले नाहीत, दिलीप वळसे-पाटलांची जहरी टीका

0

पुणे : राष्ट्रवादी पक्षात फुट पडून अजित गट आणि शरद पवार गट निर्माण झाले. शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे दिलीप वळसे-पाटील यांनी देखील शरद पवार यांची साथ सोडत अजित गटात सामील झाले. त्यांना मंत्री पद मिळाले आहे. दरम्यान, शरद पवार यांनी खूप काही देऊनही त्यांनी दगा केल्याची टीका त्यांच्यावर होत होती. दरम्यान, या टीकेला त्यांनी थेट शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करून उत्तर दिले आहे. दिलीप वळसे-पाटील म्हणाले, शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही. आपल्याकडं शरद पवारांसारखे उत्तुंग नेते असताना फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात, असे ते म्हणाले.

दिलीप वळसे-पाटील पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी वरील टीका केली. दिलीप वळसे-पाटील म्हणाले, “देशात शरद पवार यांच्या उंचीचा नेता नाही. पण, महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही. त्यामुळे शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. मात्र, या उलट ममता बॅनर्जी, मायावती या नेत्या स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या.

पाटील म्हणाले, ईडीच्या नोटिसा मिळाल्यामुळे गद्दारी केल्याचा आरोप होत असल्याची टीका केली जाते. या बाबतची कोणाला नोटीस सापडली तर मी आमदारकीचा राजीनामा देईंन. राज्य सरकारमध्ये मी, अजित पवार व काही सहकारी सहभागी झालो. याचा अर्थ भारतीय जनता पक्षात गेलो असे अजिबात नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरच आहोत. ईडी, सीबीआय इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यामुळे राज्य सरकारमध्ये सहभागी झाले असा अपप्रचार केला जात आहे. ते चुकीचे आहे, असे पाटील म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)