डोंबिवली पश्चिमेत वाहतूकीत मोठा बदल
ऑगस्ट १९, २०२३
0
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील सखारामनगर काॅम्पलेक्स भागातील काँक्रीट रस्त्याने बाधित रोहित्र, वीज वाहिन्या भूमिगत टाकण्याचे काम शनिवार १९ ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार आहे. सखाराम काॅम्पलेक्स जवळील रघुनाथ म्हात्रे इमारत ते साई प्लाझा इमारतीपर्यंतचा रस्ता वीज वाहिन्यांचे काम पूर्ण होईपर्यंत पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे.
रघुनाथ म्हात्रे इमारत ते साई प्लाझा इमारतीपर्यंतच्या १५० मीटर काँक्रीटीकरण, लघु दाब वीज वाहिन्यांचे काँक्रीटीकरणामुळे तात्पुरता वाहतूकीत बदल करण्याची मागणी पालिकेचे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी वाहतूक विभागाकडे केली होती. हा रस्ता सखाराम काॅम्पलेक्स रिक्षा स्टॅन्ड जवळ बंद राहणार असल्याने चालकांनी कोपर भागातील स्वामी समर्थ रस्ता मार्गे वळण घेऊन इच्छित स्थळी जावे, असे आवाहन डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी विभागाने केले आहे. काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता बंद राहणार आहे.