मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शाळा गुरुवारी बंद राहणार

0


मुंबई : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू असून कोकणासह अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. याचबरोबर, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शाळांना उद्या, गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

विधान भवन परिसरात मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. 'राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज आहेत. सकाळपासूनच मी मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीनं मदत व बचाव कार्य सुरू करावं अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)