देशातील इंधनाचे दर सरकारी तेल कंपन्या दररोज ठरवतात. ही किंमत अनेक गोष्टींवर अवलंबून असते. आज शनिवारी देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे. त्याचबरोबर शहरांमधील दरही स्थिर राहिले आहेत.
देशातील चार महानगरांपैकी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. तर दिल्लीत आज पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.