मुंबई : शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप पार पडल्यानंतर सरकारने ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून संबंधित सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी शुक्रवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये राज्यातील अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत.
कायम चर्चेत असणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या दीड महिन्यात पुन्हा बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता तुकाराम मुंढे यांना थेट मंत्रालयात बसवण्यात आले आहे. तुकाराम मुंढे हे आता कृषी आणि पशूसंवर्धन विभागाचे सचिव म्हणून काम पाहतील. तुकाराम मुंढे यांची गेल्या १६ वर्षांत तब्बल २० वेळा बदली झाली आहे. महिन्याभरापूर्वीच त्यांना कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी -
1. राजेंद्र शंकर क्षीरसागर - मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई शहर मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. वर्षा ठाकूर-घुगे - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांची जिल्हाधिकारी लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. संजय चव्हाण - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. आयुष प्रसाद - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांची जिल्हाधिकारी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. बुवनेश्वरी एस - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांची जिल्हाधिकारी, वाशिम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6. अजित कुंभार - सह आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांची अकोला येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7. डॉ. श्रीकृष्णनाथ बी. पांचाळ, - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ यांची जिल्हाधिकारी, जालना म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8. डॉ. पंकज आशिया - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
9. कुमार आशीर्वाद - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांची जिल्हाधिकारी, सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
10. अभिनव गोयल - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांची जिल्हाधिकारी, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
11. सौरभ कटियार - मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, अकोला यांची जिल्हाधिकारी, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
12. तृप्ती धोडमिसे - प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी धुळे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, सांगली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
13. अंकित,- प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अहेरी, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
14. शुभम गुप्ता, - प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अटापली SDO, पो.भारमरागड, ITDP, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
15. मीनल करनवाल, - प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, नंदुरबार NANDURBAR यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
16. डॉ. मैनाक घोष - प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली -सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
17. मनीषा माणिकराव आव्हाळे - प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, सोलापूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
18. सावन कुमार - प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, धारणी, ITDP, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
19. अनमोल सागर - सहाय्यक जिल्हाधिकारी, देवरी उपविभाग, गोंदिया यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
20. आयुषी सिंह - प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार, ITDP, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
21. वैष्णवी बीव - सहायक जिल्हाधिकारी, तुमसर उपविभाग, भंडारा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., अकोला.