बदलापूरमध्ये पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

0


बदलापूर : सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. राज्यात यावर्षी पावसाने उशिरा सुरुवात केली आहे. मात्र राज्यातीन अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाने उशिरा सुरुवात केल्यामुळं शेतकऱ्यांनी जी परेणी केली होती. त्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. मात्र सध्या राज्यभरात समाधानकारक पाऊस होत आहे. दरम्यान, काल रात्रीपासून (मंगळवार) मुंबईसह पश्चिम उपनगर तसेच ठाणे, डोबिंवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर येथे मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच पश्चिम उपनगरात अंधेरी, बोरिवली, वसई, विरार आणि नालासोपारा येथे मुसळधार पाऊस होत आहे. पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळं याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. बदलापूरमध्ये मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, काल रात्रीपासून मुंबईसह पश्चिम उपनगर तसेच ठाणे, डोबिंवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर येथे मुसळधार पाऊस पडत आहे. बदलापूरमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यत येत आहे. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सकाळी 9 वाजता पाणी पातळी 16.50 मीटरने वाढली आहे. पातळी 16.5 मीटर असून, धोक्याची पाणी पातळी 17.5 मीटर एवढी आहे. त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)