अश्लील व्हिडिओ व्हायरल होताच किरीट सोमय्यांनी फडणवीसांना लिहिलं पत्र

0


मुंबई : भाजपाचे दिग्गज नेते आणि सातत्याने विरोधकांवर घोटाळ्याचे आरोप करणारे किरीट सोमय्यांवर खळबळजनक आरोप करण्यात आले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीच्या हाती किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडिओ लागला असून त्यावरून महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांचा तो अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता 'मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केला नसल्याचं' सांगत किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सोमय्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे.

फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्यांनी म्हटलं की, सोमवारी सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लीप प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यानंतर मी अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा दावा करण्यात येत आहे. यासंदर्भातील अनेक व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येत आहे, परंतु मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही. त्यामुळं आपण या व्हायरल व्हिडिओची आणि आरोप करणाऱ्यांची चौकशी करावी, अशी विनंती किरीट सोमय्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. किरीट सोमय्यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)