शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच : ‘या’ नेत्यांच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ?

0


मुंबई : मागील वर्षी शिंदे गटातील चाळीस आमदारांनी बंड करत भाजपासोबत सरकर स्थापन केले. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर तब्बल 39 दिवसानंतर झाला. म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यावेळी भाजपातील व शिंदे गटातील प्रत्येकी 9 आमदारांना मंत्रिपदी देण्यात आली. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होऊन जवळपास ९ महिने होत आले आहे, तरी सुद्धा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये नाराजी वाढत असताना, आता मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर लवकरच दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी नऊ महिन्यांपासून रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारास परवानगी दिल्याची सुत्रांची माहिती आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर १९ जूनला येणारा पक्षाचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. तो दणक्यात साजरा करण्याचे शिंदेंचे नियोजन आहे. यात शिंदे गटाचे आणखी १० मंत्री वाढावेत, असे त्यांचे प्रयत्न आहेत. दरम्यान, भाजप व शिंदेसेनेतील प्रत्येकी १० आमदारांना मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यात दोन्ही गटातील प्रत्येकी एक किंवा दोन महिलांनाही स्थान दिले जाऊ शकते.

मंत्रिपदासाठी अनेकांचे गुडघ्याला बांशिंग

दरम्यान, मंत्रिपदासाठी अनेकजणांनी गुडघ्याला बांशिंग बांधून बसले आहेत. यात शिंदे गटातील व भाजपातील अनेकजण इच्छुक आहेत. दरम्यान, दुसरा मंत्रिमंडळ विस्तार उन्हाळी अधिवेशनाच्या आधी होईल, असं बोललं जात होतं. मात्र दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. परिणामी शिंदे बंडाळी गटातील नाराज आमदारांची अस्वस्थता वाढली आहे. अस्वस्थता दूर करण्यासाठी काही आमदारांना विविध महामंडळावर वर्णी लावण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नसल्याने शिंदे गटाच्या आमदारांमधील अस्वस्थता वाढू लागली आहे. तर शिंदे गटातील काही आमदारा मंत्रीपदासाठी गुघ्याला बांशिंग बांधून बसल्याची टिका विरोधकांनी केली आहे.

मंत्रिपदासाठी चर्चेतली नावं

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर तीन महिने झाले तरी, अजून दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने तर्कवितर्क काढले जात आहेत. भाजपा व शिंदे गटातून अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे, भाजपातून प्रवीण दरेकर, नितेश राणे, प्रसाद लाड, आमदार राम कदम ही चर्चेतील नाव आहेत, तर शिंदे गटातून, आमदार शिरसाठ, बच्चू कडू, आदींची नावं चर्चेत आहेत. तर भाजपातून संजय कुटे, योगेश सागर, किसन कथोरे, मनीषा चौधरी, रणधीर सावरकर, गणेश नाईक, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर , जयकुमार रावल, देवयानी फरांदे. तर शिंदे गटातून याेगेश कदम, भरत गोगावले, बच्चू कडू , संजय रायमूलकर, संजय गायकवाड, संजय शिरसाट, अनिल बाबर, प्रकाश आबिटकर, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, सुहास कांदे यांची नावे चर्चेत असल्याची माहिती समोर येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)