मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या सामान्यांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. कारण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने धुंवाधार बॅटिंग केली आहे. त्यातच आता राजधानी मुंबईसह ठाण्यात पुढील तीन ते चार तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. दुपारी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर आता मुंबई आणि ठाण्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई आणि ठाण्यात पुढील ४८ तास ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं आज संध्याकाळी तसेच रात्री उशिरा शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही शहरांतील तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअस पर्यंत राहणार असल्याचाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राजधानी मुंबईत उकाड्याने नागरीक हैराण झाले होते. आज दुपारी शहरातील काही भागांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली असून त्यामुळं सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आज सकाळपासून मुंबई आणि ठाण्यातील तापमानात घट झाली असून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असून पुढील तीन ते चार तासांत मुंबईसह ठाण्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच दोन्ही शहरांमध्ये हवामान खात्याकडून अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या मुंबई विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळं आता मान्सून सुरू होण्यापूर्वीच मुंबईकरांची पावसामुळे दैना होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई तसेच ठाण्याच्या तापमानात सातत्याने घट होत असल्याचं दिसून येत आहे. तसेच कालपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हवामान खात्याकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.