एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार सरकारी कामगारांप्रमाणे महागाई भत्ता
जून १५, २०२३
0
मुंबई : सरकारी सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी गेल्यावर्षी जवळपास तीन महिने संपाचे हत्यार उपसलेल्या एसटी कामगारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना देखील महागाई भत्ता मिळणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज एसटी महामंडळाचा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे.
या कार्यक्रमात भाषणा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेकी,'' आज एसटी महामंडळाचा वर्धापन दिनआहे. त्यासोबतच यंदाचे वर्ष एसटीचेअमृत महोत्सवी वर्ष आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीला ओळखले जाते. मी जुनी एसटी पाहिली, तीही चांगली आहे. जूनं ते सोनं अस म्हटलं जातं हे खोटं नाही.
मुख्यमंत्री म्हणाले की, एसटी बद्दल सगळ्यांना सहानुभूती आहे. मोफत प्रवास आणि महिलांना आरक्षण दिल्यामुळे विरोधकांना जरा भीती वाटत आहे. एसटीने आता दाखवले आहे की हम भी किसीसे कम नही. एसटीची सेवा सुधारत चालली आहे. सरकारचे अधिकाऱ्यांना नेहमी सांगणे असते की, गाडीचा पत्रा निघाला असेल तर त्याला दुरुस्त करत जावा. जेणेकरून अपघात होणार नाही.