मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

0

 


मुंबई : मध्य महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात पुढच्या २४ तासांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे लांबलेला पाऊस आता सक्रिय झाला आहे. रविवारी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर भागात जोरदार पाऊस पडला आहे. तसंच विविध जिल्ह्यांमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. आता मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट हवामान खात्याने आणि मुंबई महापालिकेने दिला आहे.

मुंबईसह पालघर, ठाणे या जिल्ह्यांसाठी मंगळवारी आणि बुधवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण आणि विदर्भात २६ आणि २७ जून या दोन दिवशी तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात २६ आणि २७ जून या दोन दिवशी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याचा ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट 

  • २६ जून : रायगड, रत्नागिरी, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर.
  • २७ जून : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, अमरावती, नागपूर.
  • २८ जून: मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक.
  • २९ जून : रायगड

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)