एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार? राजकीय वर्तुळात चर्चा... खडसे म्हणतात..

0

जळगाव : भाजपा पक्षातील अंतर्गत कलह, रस्सीखेच आदीला कंटाळून तीन वर्षापूर्वी एकनाथ खडसेंनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र त्यानंतर आता माजी मंत्री विनोद तावडे यांनी खडसेंना भाजपमध्ये परत येण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी पुन्हा भाजपात येण्याचं निमंत्रण देत भावनिक साद तावडेंनी घातली आहे. “नाथाभाऊ तुम्ही परत भाजपात या”, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, त्यामुळं खडसे पुन्हा एकदा भाजपात  जाणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असताना, स्वत: खडसेंनीचा एका वाक्यात उत्तर देत, याविषयावर पूर्णविराम दिला आहे.


एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. भाजप खासदार रक्षा खडसे  यांनी अमित शाह आणि एकनाथ खडसे यांच्यात फोनवरुन चर्चा झाली असल्याचं माध्यमांशी बोलताना म्हटलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जाऊ लागले. अखेर खुद्द एकनाथ खडसे यांनीच या सगळ्यावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलंय. ‘एकाच घरात दोन लोकं दोन वेगवेगळ्या पक्षात असणं काही नवं नाही. आमच्याही घरात तसं आहे’, असं त्यांनी म्हटलंय. तसेच आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.


देवेंद्र फडणवीस अण्णाजी पंताच्या भूमिकेत.

दरम्यान, पुढे बोलताना खडसे म्हणाले की, पक्षवाढीसाठी आपण रक्ताचे पाणी केले. ज्या पक्षासाठी इतकं केले, त्या पक्षाने मला वाऱ्यावर सोडलं. २०१४ पासून माझा ज्या पक्षात छळ झाला. अनेक चौकशा लावण्यात आल्या त्या पक्षात आता मी पुन्हा जाणार नाही. भाजपमध्ये ज्यांच्यावर मोठे मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते पक्षात येऊन स्वच्छ झाले. अडचणीच्या काळात शरद पवार यांनी मला पाठिंबा दिला, पवारसाहेबांनी माझे राजकीय पुनर्वसन केले. मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होतो म्हणून मला डावलण्यात आले. देवेंद्र फडणवीसांना अध्यक्ष करण्यात माझा मोठा वाटा आहे, ते शेवटच्या बेंचवर बसायचे, त्यांना मी पहिल्या बेंचवर आणले. आणि त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्य़तीत असल्यामुळं त्यांनीच मला दूर सारले. फडणवीसांनी अण्णाजी दत्तो भूमिका निभावले असं खडसे म्हणाले. त्यामुळं मी आता कुठल्याही परिस्थितीत भाजपात परत जाणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)