डोंबिवली वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम तासाभरात १ लाखांचा दंड वसूल

0


डोंबिवली : डोंबिवली शहर वाहतूक उप विभाग यांच्यावतीने आज (२४ जून) म्हसोबा चौक, ९० फुटी रोड खंबालपाडा याठिकाणी फ्लॅश डिप्लॉयमेंट करून नियम मोडणा-या वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. संबंधित ठिकाणी सकाळी ११ ते १२ एक तास चाललेल्या या विशेष मोहीमेत १८२ वाहनचालकांवर कारवाई करून एकुण एक लाख तीन हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला असून त्यापैकी ७२९०० ₹ दंड जागीच वसूल करण्यात आला आहे.

या मोहीमेत शहर वाहतूक शाखा कल्याणचे पोलिस निरीक्षक गिरीश बने यांच्यासह एक अधिकारी, नऊ पोलिस कर्मचारी आणि आठ वॉर्डन सहभागी झाले होते. विना हेल्मेट असलेले ४९, विना सीट बेल्ट २२, ब्लॅक फिल्म लावणारे १, ट्रीपल सीट जाणारे ४ जण, फ्रंट सीट बसविणारे ३ जण, विना परवाना २, गणवेश न घालणे ३ जण, मोबाईलवर बोलणारे चार आणि सिग्नल तोडणारे ६ व इतर ९४ जण अशा १८२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

संबंधितांवर आकारलेल्या एक लाख ३ हजार या एकुण दंडापैकी बहात्तर हजार ९०० रूपयांचा दंड जागेवरच वसूल केला गेला अशी माहीती पोलिस निरीक्षक उमेश गीते यांनी दिली. या मोहीमे दरम्यान वाहनचालकांचे वाहतूक नियमांबाबत प्रबोधन देखील करण्यात आले. तसेच विशिष्ट वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांनी मोटार वाहन नियमांचे पालन करण्याची माहीती देऊन केडीएमसी सिग्नल वरील पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीमदवारे जनजागृती देखील करण्यात आल्याकडे बने यांनी लक्ष वेधले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)