शिंदे-फडणवीस यांच्यात बंद दाराआड बैठक, बैठकीला श्रीकांत शिंदे देखील हजर

0


मुंबई : सरकारच्या दोन वेगवेगळ्या जाहिरातींमुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील वातावरण तापले आहे. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. या सर्व वादानंतर सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  महारा यांच्यात रात्री उशिरा बंद दाराआड बैठक झाली.

दरम्यान, जाहिरातींच्या वादानंतर आज सकाळी शिंदे-फडणवीस पालघरमध्ये एका कार्यक्रमात एकत्र होते. जाहिरातीच्या वादानंतर शिंदे आणि फडणवीस यांच्यातील ही पहिलीच भेट होती. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण-डोंबिवली मतदारसंघात स्थानिक भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांनी शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद पेटला होता. या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तोडगा निघाल्याचे समजते. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकाळीच पालघर येथील कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करून त्यांना सबुरीचा सल्ला देत युतीधर्माचे पालन करण्यास सांगितले. त्यानंतर लगेचच संध्याकाळी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशीही चर्चा केली. बंद दाराआड झालेल्या या चर्चेदरम्यान भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्याकडून निर्माण केल्या जाणाऱ्या अडचणींचा पाढा श्रीकांत यांनी वाचल्याचे समजते. यावर फडणवीस यांनी येथून पुढे असे घडणार नसल्याचा शब्द दिल्याचे समजते. मात्र, त्याचवेळी त्यांना युतीधर्माचे पालन करण्यासही सांगितल्याचे समजते.

या बैठकीत भाजप आणि शिंदे यांच्यातील मतभेद दूर होऊन समन्वय आणि सलोख्यावर भर देण्यात आला. आपली खासदारकी युतीत बाधा येत असेल तर आपण राजीनामा द्यायला तयार असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले. त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षात कार्यकर्त्यांचं ऐकलं जातं, असं रवींद्र चव्हाण म्हणाले. मात्र नेमकं या बैठकीत काय घडले याचा तपशील समोर आला नाही, किंवा कोणत्या कारणासाठी या तीन नेत्यांमध्ये बैठक पार पडली, हे समोर आले नसले तरी, रात्री उशिरा पार पडलेल्या या बैठकीमुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)